त्रिमुर्ती टॉकीजचे मालक नंदकुमार दौंडे यांचे निधन
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला येथील त्रिमुर्ती टॉकीजचे मालक नंदकुमार गणपत दौंडे यांचे परवा बुधवार दि.15 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 60 वर्षे होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी आज शुक्रवार दि.17 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील स्मशाानभूमीत होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.