सांगोला तालुका
इनरव्हील क्लब यांचे कडून आलेगाव कॉलेजला ऑफिस टेबल भेट..

इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचे मार्फत दिनांक 16 मार्च 2023 वार गुरुवार रोजी कै. पांडुरंग आबा भांबुरे ज्युनिअर आर्ट अँड सायन्स कॉलेज आलेगाव येथे , प्रिन्सिपल ला बसण्यासाठी व कामकाज करण्यासाठी ऑफिस टेबल देण्यात आला. सदर काॅलेज विनाअनुदानित असुन विद्यार्थी संख्या 400 आहे. काॅलेजची गरज लक्षात घेऊनच ” जिथे गरज तिथे इनरव्हील ” यानुसार काॅलेजला ऑफीस टेबल देण्यात आले.
प्रस्ताविक व क्लब ची माहिती अध्यक्षा उमा उंटवाले यांनी दिली. काॅलेज ची माहिती प्राचार्य सौ. मयुरी भारत मोरे यांनी दिली. सदर टेबल घेण्यासाठी सौ हर्षदा दयानंद गुळमिरे , सौ. सुरेखा औदुंबर सपाटे आणि सौ संगीता चौगुले यांचे विशेष सहाय्य लाभले . सदर कार्यक्रमासाठी क्लब अध्यक्षा सौ. उमा उंटवाले, मेंबर सौ.कविता दिवटे, व सौ. हर्षदा गुळमिरे तसेच कॉलेजच्या प्राचार्य मयुरी भारत मोरे, सहशिक्षिका हिराबाई बळवंत देशमुख आणि सहशिक्षक अनिल विकास अनिल बाबर उपस्थित होते. तसेच कॉलेजची विद्यार्थिनी राजश्री नंदकुमार इंगोले हे उपस्थित होते. आभार प्रदर्शन व सन्मान प्राचार्य मयुरी भारत मोरे व हिराबाई बळवंत देशमुख यांनी केले.