वाघमोडेवाडी प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
सांगोला(प्रतिनिधी):- जि.प.प्राथ.शाळा वाघमोडेवाडी (आलेगाव) या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन आलेगाव गावचे ग्रामपंचायत सदस्या सौ.पुनम सलगर मॅडम यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामपंचायत सदस्य श्री.आकाशकुमार नवघरे व केंद्रप्र्रमुख राजेश गडहिरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अर्जुन पोळ गुरुजी, रावसाहेब हजारे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे दिलखेचक अदा आणि नृत्याने सर्व उपस्थितांची दाद मिळविली. आलेगाव, वाकी मेडशिंगी या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य, बालगीते, रिमीक्स गाणी, लावण्या यावर अतिशय बहारदार नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी पालकांची मने जिंकली.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री. विद्यासागर नवघरे गुरुजी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब इंगवले यांनी तर आभार प्रदर्शन श्री.भारत जावीर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.बंडोपंत वाघमोडे व सर्व सदस्य, अंगणवाडी ताई सौ.सलगर मॅडम,आगतराव (तात्या) वाघमोडे यांच्यासह सर्व वाडीवरील ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.