सांगोला तालुका

सांगोला औद्योगिक सहकारी वसाहतीवर शेतकरी कामगार पक्षाचे अबाधित  वर्चस्व

सांगोला औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सांगोला मतदारसंघातील निवडणूक सन 2022-23 ते 2027 -28 या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा देशमुख,सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कमलापूर येथे कार्यरत असलेली सांगोला औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सांगोला. या सहकारी संस्थेची पंचवार्षिक बिनविरोध  निवडणूक यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये एकूण पंधरा संचालकाची एक मुखी निवडी करण्यात आल्या.सोसायटी मतदारसंघातून लवटे मारुती भीमराव(कडलास) यांची बिनविरोध निवड झाली.कारखानदार मतदारसंघातून एकूण सहा उमेदवार बिनविरोध झाले. यामध्ये चांदणे अशांक बाळकृष्ण,(सांगोला) पाटील अरुण धर्मराज,(सांगोला) पाटील प्रज्ञा अण्णा,(चिकमहुद), पाटील सतीश बाबुराव (वझरे), येलपले शैला शशिकांत(यलमार मंगेवाडी),  लिगाडे विजयमाला नागनाथ,(अकोला-वा) काटकर विद्या रमेश(सांगोला) या सर्व संचालकाची कारखानदारी या मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली. तर महिला मतदारसंघातून देशमुख उषा रवींद्र (सांगोला), इतर मतदार संघातून तीन प्रतिनिधींची निवड करण्यात आली. आदाटे विजय नारायण (नाझरे), देशमुख चंद्रकांत गणपतराव (सांगोला), नरळे नितीन पांडुरंग (लक्ष्मी नगर), इतर मागास प्रवर्गातून कांबळे श्याम दगडू (सांगोला), तर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून बंडगर बाबुराव धोंडीबा, (कमलापूर), अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून जगधने वामन कोंडीबा (नराळे) वरील सर्व संचालकाची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल  निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, चंद्रकांत दादा देशमुख, युवा नेते बाबासाहेब देशमुख, युवा नेते अनिकेत देशमुख, मारुती आबा बनकर,ज्येष्ठ नेते बाबासाहेब कारंडे, तालुका चिटणीस दादासो बाबर,संगम आप्पा धांडोरे,बाळासाहेब काटकर,उषा देशमुख,अण्णासाहेब पाटील, अरुण पाटील, बाळू  पाटील,कुमार माळी, पांडुरंग पांढरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी,तरुण मित्र, महिला भगिनी यांनी मोलाची सहकार्य केले. सदरची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून पी.आर. नालवार यांनी व्यवस्थित रित्या पार पाडली. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!