सांगोला तालुका

युवकांचे प्रेरणास्थान अरविंद वलेकर यांच्या प्रयत्नांना यश; गोरगरिबांच्या शेकडो अपात्र पोलिस उपनिरीक्षक पदाच्या उमेदवारांना मुलाखतीस बोलवले जाणार

सांगोला(प्रतिनिधी):-पीएसआय मुलाखतीसाठी सन 2019-20 व 2020 – 21 चे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राऐवजी 2021-22 किंवा 2022-23 सालचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याबाबतचा निर्णय करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी नेते अरविंद वलेकर यांच्या नेतृत्वात गेल्या काही महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
या सर्वांमध्ये विद्यार्थी नेते अरविंद वलेकर यांना विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांची खूप मदत झाली या सर्वांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून उमेदवारांना मुलाखतींपासून रोखणारी ही जाचक अट रद्द केल्याबद्दल इतर मागासवर्ग व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे आभार गोपीचंद पडळकर आणि अरविंद वलेकर यांनी विधानभवनात जाऊन मानले.
या निर्णयाचा पीएसआय मुलाखतीस पात्र ठरलेल्या किमान 400 उमेदवारांना फायदा होणार असून यापूर्वी ज्यांना या मुलाखतीसाठी अपात्र करण्यात आले होते त्यांना देखील मुलाखतीची संधी दिली जाणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील विविध जिल्यातील पीएसआय मुलाखतीस पात्र झालेल्या सर्व विद्यार्त्यांनी प्रत्यक्षात भेटून, तसेच भ्रमणध्वनी वरून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!