सांगोला तालुका

स्वर्गीय मा. आम. भाई गणपतरावजी देशमुख विचार मंचच्यावतीने महिलांच्या कौशल्याला व कल्पकतेला वाव देण्यासाठी सांगोला येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन: डॉ. निकीताताई देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यामधील कौशल्याला आणि कल्पकतेला प्रोत्साहन मिळावे म्हणुन स्व. मा.आम. भाई गणपतरावजी देशमुख विचारमंच आयोजित क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा तसेच रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यासह कौटुंबिक असा पाच फुटाचा बच्चन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. निकिता बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनार्थ सांगोला वासूद रोडवरील हॅप्पी पार्क चौपाटी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. निकिता देशमुख बोलत होत्या. या पत्रकार परिषदेसाठी माजी उपनगराध्यक्ष स्वाती मगर, सीताताई ढोबळे, अंजू माने, माधुरी जाधव, विद्या जाधव, शितल लवटे, शितल वाघमोडे, स्वाती नकाते, नेहा जवंजाळ, सुप्रिया होनराव आदी उपस्थित होत्या.
स्वर्गीय मा. आम. भाई गणपतरावजी देशमुख विचार मंच आयोजित महिला दिन सप्ताह निमित्ताने क्रांती नाना मेळगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड अनमोल आईस्क्रीम पार्लर समोर सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान व्हावा, महिलांचे मनोरंजन व्हावे या माध्यमातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेल्या या महिला सन्मान सप्ताहाच्या निमित्ताने 16 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनार्थ जय्यत तयारी सुरू असून, या स्पर्धेमध्ये बक्षीस देखील ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी पाच बक्षीस यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रीज व पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी टीव्ही व पैठणी, तृतीय क्रमांकासाठी मिक्सर व पैठणी, चतुर्थ क्रमांकासाठी गॅस शेगडी व पैठणी आणि पाचव्या क्रमांकासाठी गिफ्ट व पैठणी असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी 16 तारखेला कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत नाव नोंदणी सुरू असणार आहे. तसेच लकी ड्रॉ मार्फत 100 बक्षीस वितरित करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे रविवार दिनांक 19 रोजी स . 10 ते 1 पर्यंत रांगोळी स्पर्धा व दु. 1 ते 3 वाजेपर्यंत वेशभूषा स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. याचदिवशी सायंकाळी 6 वाजता ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यातील एक पात्री असे पाच फुटाचा बच्चन हे कौटुंबिक – कॉमेडी नाटक सादर केले जाणार आहे.
तरी सांगोला शहर आणि तालुक्यातील मुली व महिलांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ही डॉ. निकिता देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!