सांगोला तालुका

एल.के.पी मल्टीस्टेटचा भोसे येथे उद्या  लोकार्पण सोहळा; प्रेरणादायी वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या भोसे तालुका मंगळवेढा येथील शाखेचा लोकार्पण सोहळा तीन तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या व आजूबाजूच्या अनेक गावांची व्यापार पेठ असलेल्या भोसे येथे आज सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम व प्रेरणादायी वक्ते, लेखक विचारवंत व इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

भोसे गावचे सुपुत्र व मंगळवेढा तालुक्याचे माजी सभापती तानाजीभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी भोसे गावच्या सरपंच सौ सुनीता ढोणे , मारोळी गावचे सरपंच राजकुमार पाटील, शिरनांदगी गावच्या सरपंच सौ मायाक्का थोरबोले , हुन्नूर गावच्या सरपंच सौ मनीषा खताळ, नंदेश्वर च्या सरपंच सजाबाई गरंडे , रड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, निंबोणीच्या सरपंच सौ वंदना शिंदे, चिखलगी गावचे सरपंच दिनेश पाटील, वाणीचिंचाळे गावच्या सरपंच सौ प्रियांका गडहिरे, महमदाबादचे सरपंच यशवंत होळकर , मानेवाडी चे सरपंच दत्तात्रय मळगे, रेवेवाडी चे सरपंच ब्रह्मदेव रेवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. इथे नांदते लक्ष्मी… देते विश्वासाची हमी…. हे ब्रीद घेऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा ,कोकण प्रांत व शेजारील कर्नाटक राज्य असे मोठे कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवत सुमारे 43 शाखांच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत घेऊन वित्तीय क्षेत्रामध्ये भरारी घेत असलेली ही संस्था आहे.

सांगोला तालुका तसेच सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये गेली अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले,. सहसंस्थापक सर्वश्री डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी या चार युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांचे जाळे उभे केलेले आहे. सूर्योदय शूटिंग शर्टिंग, सूर्योदय वस्त्र निकेतन अँड फर्निचर मॉल , सूर्योदय मोटर्स, मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स, शॉपिंग सेंटर तसेच कृषी क्षेत्र त्याचबरोबर धवलक्रांतीसाठी देखील या उद्योग समूहाचे मोठे योगदान आहे. सुपर सूर्योदय ॲग्रो & मिल्क इंडस्ट्रीज मेडशिंगी यासह पाच चीलिंग प्लांट च्या माध्यमातून नुकताच एक लाख लिटर प्रति दिन दूध संकलनाचा टप्पा देखील ओलांडण्यात आला आहे. या उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. वित्तीय क्षेत्रामध्ये या समूहाचे मोठे काम असून आजवर हजारो गरजू कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावलेला आहे. या उद्योग समूहाने सन 2022 पासून मल्टीस्टेटच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले असून एल के पी मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शाखांचे जाळे उभा केले आहे. छोट्या मोठ्या उद्योग व व्यावसायिकांकरिता ही संस्था वरदान ठरलेली असून त्वरित व सुलभ कर्ज योजना हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. ठेवीदारांसाठी देखील कितीतरी प्रकारच्या आकर्षक योजना या संस्थेच्या वतीने देऊ केलेल्या आहेत. एल के पी दाम दुप्पट योजना, दीडपट, तिप्पट तसेच दाम चौपट योजना, एल के पी कन्यादान योजना, पेन्शन योजना अशा विविध प्रकारच्या योजनांबरोबरच अवघ्या 100 दिवसांच्या ठेवीवर देखील ही संस्था दहा टक्के इतका व्याजदर देते. सात टक्क्यांपासून मुदतीच्या टप्प्याटप्प्याने ठेवीचे व्याजदर वाढले जात असून 24 महिन्यांच्या पुढे ही संस्था साडेबारा टक्के इतका व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिक ,अपंग ,विधवा भगिनी ,माजी सैनिक, संत महंत यांना अर्धा टक्के जादा व्याजदर असून आशांकरिता ही संस्था 24 महिन्यांच्या पुढे तब्बल 13 टक्के इतका व्याजदर देते. व्यावसायिक व व्यापारी बांधवांसाठी आरटीजीएस ,एन ई एफ टी ,आय एम पी एस याबरोबरच सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा येथे मोफत उपलब्ध आहेत. सुसज्ज फर्निचर ,सेवाभावी वृत्तीचा कर्मचारी वृंद, सुमारे अठरा ते वीस वर्षापासून चा सहकाराचा अनुभव असलेले संचालक मंडळ व सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा असलेल्या या संस्थेचा लोकार्पण सोहळा येथे आज संपन्न होत असल्यामुळे भोसे व परिसरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या या लोकार्पण सोहळ्याकरिता व नामवंत वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान ऐकण्याकरिता भोसे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी संचालक मंडळांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!