सांगोला तालुका

सीए जुबेर मुजावर व सीए तबस्सुम जुबेर मुजावर यांच्या जे.आय. मुजावर अ‍ॅण्ड असोसिएटस  चार्टर्ड अकाउंटंट नूतन कार्यालयाचे भव्य उद्घाटन

सांगोला(प्रतिनिधी):- सध्या काळ बदलत चालला असून देशाची अर्थव्यवस्थाही बदलली आहे. यापुढील काळात कोणालाही अर्थ व्यवस्था  लपविता येणार नाही. सांगोला तालुका गतिमानतेने विकासाकडे धाव घेत आहोत.पायाभूत सुविधामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुका अग्रेसर राहील असे सांगत सांगोला तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा चित्र येणार्‍या दोन वर्षात बदलणार असून  सांगोला तालुक्याच्या भविष्य काळासाठी सीए.जुबेर मुजावर यांचे एक अत्यंत गरजेचे दालन उभे राहिले आहे अशा शुभेच्छा आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिल्या.
माजी नगरसेवक सीए जुबेर मुजावर व सी.ए तबस्सुम जुबेर मुजावर सांगोला यांच्या जे.आय. मुजावर अ‍ॅण्ड असोसिएटस  चार्टर्ड अकाउंटंट या नूतन कार्यालयाचा उदघाटन सोहळा काल रविवार दिनांक 12 मार्च रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर रफिक नदाफ,  शिवाजीराव काळूंगे, अनिल खडतरे, तानाजीकाका पाटील, शिवाजी बनकर, राजू मगर, सचिन लोखंडे, अ‍ॅड उदयबापू घोंगडे, चंदन होनराव, दिलावर तांबोळी, अ‍ॅड.बंडू काशीद,प्रा.संजय देशमुख,  उपस्थित होते. यावेळी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील बोलत होते.
यावेळी मा.आ.दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोल्याच्या अर्थकारणामध्ये सीए जुबेर मुजावर व त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून  ऐतिहासिक पाऊल पडले आहे. मितभाषी स्वभावातून एक चांगली प्रतिमा जुबेर यांनी तयार केली आहे. पहिल्याच प्रयत्नात सीए होणारे फार कमी असतात.त्यामध्ये जुबेर यांचा क्रमांक लागतो. राजकारण करत असताना आपल्या व्यवसायात खंड पडू दिला नाही याचा मला अभिमान असून जुबेर सारखे कार्यकर्ते मिळायला सुद्धा भाग्य लागते. जुबेर यांच्या हातून भविष्यात समाजाची चांगली सेवा घडेल अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री.बाबुराव गायकवाड यांनी सांगोला तालुक्यात अनेक व्यवसाय व धंदे निघाले, त्यामुळे सर्वांनाच सीए ची गरज असून जुबेर मुजावर  सर्वांना चांगली सेवा देतील अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
माजी नगराध्यक्ष प्रा.प्रबुध्दचंद्र झपके म्हणाले, जुबेरची सीए झाल्यापासून चढती कमान मी पाहिली आहे. जुबेरची प्रगती पाहून माझ्या सारख्या शिक्षकाला  समाधान मिळत आहे.  पती आणि पत्नी सीए होण्याच्या पहिलाच मान त्यांना मिळाला असून सांगोला तालुक्यात उद्योगधंदे वाढायला लागले आहे त्यामुळे सीए चे महत्व आता समजायला लागले असल्याचे सांगत मुजावर कुटुंबियांना व्यवसाय वाढण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मा.जि.प.सदस्य अ‍ॅड.सचिन देशमुख म्हणाले, इन्कम टॅक्स भरण्यासाठी लागणार्‍या अनेक गोष्टी जुबेर यांच्या कडून शिकलो.सर्वात शांत व्यक्तिमत्व म्हणून परिचय असल्याचे सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपा तालुकाध्यक्ष श्री.चेतनसिंह केदार म्हणाले, जुबेर मुजावर हे माझे चांगले मित्र आहेत. सांगोला तालुक्यासह परिसरातील अर्थ व्यवसायातील ग्राहकांना जुबेर आपल्या सेवेतून प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास जगन्नाथ भगत गुरुजी, सतीश सावंत, डॉ.बंडोपंत लवटे, बशीर तांबोळी, प्रसाद राजपुरे, विजय राऊत, सनीभाई मुजावर, अभिजित कांबळे, रफिकभाई तांबोळी, गिरीशभाऊ नष्टे, अ‍ॅड.संजीव शिंदे, अ‍ॅड.पाटकुलकर, राजेंद्र पाटील, सौ.पूजाताई पाटील, रो.विकास देशपांडे, सुरेश माळी, अजगर पठाण, पत्रकार मिनाज खतीब, इकबाल मुजावर, इन्नुस मुजावर, रउफ मुजावर,मा. नगरसेवक आलमगीर मुल्ला, दिलावर भाई तांबोळी,माजी नगरसेवक रफिक भाई तांबोळी डॉ. रज्जाक मुल्ला, मकबूल मुल्ला,हाजी. कलीमोद्दीन मुल्ला,निसार मुल्ला, रियाज मुजावर, इम्रान मुजावर, शोएब मुजावर, तन्वीर मुजावर, मौलाना अब्दुल हई खान साहब, अल्लाउद्दीन खतीब, साहिल इनामदार,अ‍ॅड.मुक्तार इनामदार, साहिल खतीब, मोहसीन मुजावर, निसार इनामदार,निहाल तांबोळी, यांच्या सह मुस्लिम बांधव, राजकीय पक्षाचे पदधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सी.ए जुबेर मुजावर, सी.ए तबस्सुम जुबेर यांचा परिचय महमंद गौस मुजावर सर यांनी करून दिला. यावेळी  इकबाल मुजावर व मुसा शेख यांचा सत्कार आमदार शहाजीबापू पाटील व आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सी.ए जुबेर मुजावर यांनी केले. आभार निसार इनामदार यांनी मानले.
सर्वांचे स्वागत सी.ए जुबेर मुजावर, सी.ए तबस्सुम जुबेर,  इकबाल मुजावर , इम्रान मुजावर, तनवीर मुजावर ,शोहेब मुजावर, नुर पठाण यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!