व्यक्तिमत्व घडविणाऱ्या शिक्षणाची गरज – प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

सांगोला (प्रतिनिधी) शिक्षणातून जसे डॉक्टर, इंजिनियर, वकील व वेगवेगळे अधिकारी तयार होतात त्याचप्रमाणे चांगला माणूस निर्माण करता आला पाहिजे आणि त्यासाठी व्यक्तिमत्व घडविणारे शिक्षण देणे आवश्यक आहे असे मत माजी प्रांतपाल,म.सा.प., नगर वाचन मंदिर सांगोला अध्यक्ष ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. लायन्स क्लब ऑफ सांगोला,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला,नगर वाचन मंदिर,सांगोला, साने गुरुजी कधामाला सांगोला व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे आयोजित सेवानिवृत्त शिक्षकाच्या सत्कार समारंभामध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सदस्य ॲड ला. विजयसिंह चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर,साने गुरुजी कधामाला सांगोला अध्यक्ष भिमाशंकर पैलवान, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासो नरूटे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. झपके यांनी बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेला सामोरे गेले पाहिजे, आपला विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक तयार झाला पाहिजे असे सांगत आहेत एका गोष्टीच्या माध्यमातून मौलिक प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांचे तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक संजय शिंगाडे,निलकंठ लिंगे,तानाजी सुर्यगंध,हरिदास भोसले
न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला,इंदुमती जानकर जि.प.प्रा.शाळा पाटील वस्ती सांगोला,शहिदा सय्यद,मच्छिंद्र इंगोले,सुरेश मस्तुत,मिलिंद फाळके,मारूती बोरकर,
सिध्देश्वर नवले सांगोला विद्यामंदिर सांगोला यांचा शाल, सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर सुर्यगंध,मारूती बोरकर,निलकंठ लिंगे, भिमाशंकर पैलवान यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व, संविधान महत्व,शिक्षकांचे कार्य सांगत पूज्य बापूसाहेब व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिरविषयी कृतज्ञता व्यक्त करत सत्कारासाठी धन्यवाद दिले.
सदर कार्यक्रमाला सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.सुर्यकांत कांबळे, खजिनदार मंगेश म्हमाणे, लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य,म.सा.प. सांगोला पदाधिकारी, सदस्य, नगर वाचन मंदिर सांगोला पदाधिकारी,सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म.सा.प.प्रमुख कार्यवाह ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ला.काकासो नरुटे यांनी केले.



