महाराष्ट्र

सातत्याने  गुणीजनांचा सन्मान ही  सूर्योदय समूहाची परंपरा -अनिलभाऊ इंगवले     

सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने  सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव   

देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावून पराक्रमाची शर्थ करणारे सैनिक आणि तीस-पस्तीस वर्षे ज्ञानामृताने कित्येक पिढ्या घडवणारे गुरुजन त्याचबरोबर महसूल, कृषी, बांधकाम अशा विविध क्षेत्रांमधून अनेक वर्षे सेवा करून कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी वृंदांचा आज गौरव करत असताना वेळोवेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करण्याची सूर्योदय परिवाराची गेल्या अनेक वर्षांची परंपरा असल्याचे मत सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी व्यक्त केले.

वित्तीय संस्था आणि उद्योग याबरोबरच अनेक क्षेत्रांमधून उत्तमरीत्या कार्यरत असलेल्या सूर्योदय उद्योग समूह संचलित “सूर्योदय फाउंडेशन”  च्या वतीने सांगोला तालुक्यातील सन 2024 _ 25 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचा “सन्मान कर्तृत्वाचा” हा गौरव सोहळा सांगोला येथील महात्मा फुले चौकातील “सूर्योदय अर्बन”  संस्थेच्या प्रशस्त सभागृहामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मंचावर पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंत दिघे साहेब, जय जवान माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार रविकांत मराळ साहेब, साहित्यिक तसेच चैतन्य हास्य क्लबचे प्रा राजेंद्र ठोंबरे यांच्यासह सूर्योदय उद्योग समूहाचे सहसंस्थापक आणि सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ बंडोपंत लवटे, एल के पी मल्टीस्टेट चे व्हॉ. चेअरमन सुभाष दिघे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूर्योदयने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडलेले असून आजच्या सन्मान सोहळ्यासाठी सर्व सत्कारमूर्ती सहकुटुंब आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे आपला आशीर्वाद आणि स्नेहभाव या निमित्ताने कायम राहील अशी अपेक्षाही यावेळी  इंगवले यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

मोठी गर्दी असताना देखील सुमारे तीन तास अत्यंत शांततेत व शिस्तीत कार्यक्रम संपन्न झाल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी प्राचार्य सुनील नष्टे, माजी प्राचार्य मनोज उकळे, कॅ. हनुमंत माने, कॅ. धनाजी पवार, बंडोपंत येडगे, मिलिंद बोरकर, सुनिता खंकाळ मॅडम इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना विविध प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय करत आणि अत्यंत सक्षमपणे आर्थिक संस्था सांभाळत असताना मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सूर्योदय समूहाचे आणि त्यांच्या सर्व उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. सूर्योदय ग्रुपचे सहसंस्थापक आणि सूर्योदय अर्बनचे चेअरमन जगन्नाथ भगत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय अर्बन, सूर्योदय महिला अर्बन, सूर्योदय दूध विभाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे खरेदी दालन असलेले सूर्योदय मॉल व वस्त्रनिकेतन आणि फर्निचर मॉल इत्यादी प्रकारचे उद्योग आणि व्यवसाय करत शेकडो तरुणांच्या हाताला काम देत असताना सामाजिक बांधिलकीचे भान देखील कायम राखत वृक्षारोपण, जलसंधारण, गुनीजनांना पुरस्कार व सन्मान, तीर्थयात्रा दर्शन, विविध प्रकारची आरोग्य शिबिरे, व्यापक स्वरूपातील रक्तदान शिबिरे अशा कितीतरी माध्यमातून सूर्योदय उद्योग समूह यशस्वीपणे वाटचाल करत आहे.

सन्मान कर्तुत्वाचा या आजच्या कार्यक्रमांमध्ये सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, माध्यमिक तसेच ज्यूनियर, सीनियर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर, त्याचबरोबर सैन्य दलातील विविध पदांवरचे सेवानिवृत्त अधिकारी, ग्रामसेवक तसेच कृषी ,महसूल, बांधकाम अशा विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी वृंदांचा यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते “सन्मानचिन्ह” देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. आमच्या ध्यानीमनी नसतानाही आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या “सूर्योदय” सारख्या संस्थेने आमचा सेवानिवृत्ती निमित्त केलेला गौरव कायमस्वरूपी आमच्या स्मरणात राहील अशा भावना यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन, महिला अर्बन आणि एल के पी मल्टीस्टेटच्या कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button