*सांगोला डॉक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न*
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0040-780x470.jpg)
*राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र,सोलापूर यांच्यामार्फत निरंतर शिक्षण कार्यक्रम (C.M.E.)याचे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी सांगोला येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील तज्ञ व्याख्याते यांनी क्षयरोग (T.B.) निर्मूलनासाठी अत्याधुनिक उपचार आणि उपाययोजना यांवर सांगोला तालुक्यातील डॉक्टरांना सखोल मार्गदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख,जिल्हा क्षयरोग अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी ,वैद्यकीय अधीक्षक ,सांगोला तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांच्या प्रमुख उपस्थितीमध्यें केले होते.समस्त सांगोला डॉक्टर्स असोसिएशन – आय.एम.ए.,निमा, होमिओपॅथी ,डेंटल,सांगोला मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने महाराष्ट्रातील पहिला हृदयरोगतज्ञ डॉक्टर आमदार, सांगोला विधानसभा सदस्य, नवनिर्वाचित लोकप्रिय नूतन “आमदार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख( एम.डी. डी. एन. बी. हृदयरोग)” यांचा सपत्नीक जाहीर भव्य नागरी सत्कार सोहळा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, पुष्पहार,शाल,पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हॅप्पी पार्क चौपाटी,वासुद रोड, सांगोला येथे पार पडला.
सत्कार सोहळा प्रसंगी सर्व डॉक्टरांना संबोधित करताना डॉ.देशमुख म्हणाले की,वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे प्रश्न अडीअडचणी, दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले.सर्व डॉक्टरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
आमदारसाहेब म्हणाले की,माझ्या अडचणीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटक यांनी अतिशय मोलाची अशी साथ दिली त्याबद्दल सर्व मंडळीचे आभार.. पुढे बोलताना म्हणाले की, क्षयरोग( T.B.) या आजाराची सांगोला तालुक्यातील सध्याची आकडेवारी ही चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे यांवर त्वरीत उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आणि क्षयरोग निर्मूलनासाठी असेच कौतुकास्पद उत्तरोत्तर निरंतर शिक्षण कार्यक्रम (C.M.E.) संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावेत असे सुचविले.डॉ.निकीताताई देशमुख यांनी मनोगत करताना म्हणाल्या की,निरंतर शिक्षण कार्यक्रम(C.M.E.)यामुळे डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञानामध्ये भर पडून अजून चांगल्या प्रकारें आरोग्यसेवा देण्यासाठी याचा उपयोग होईल.डॉ.निकीताताई यांनी सांगोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,अकोला मध्ये दिलेल्या आरोग्यसेवेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला पुढे बोलताना म्हणाल्या की , वैद्यकीय क्षेत्र म्हणजे आमचे घर-कुटुंब असल्यासारखेच आहे आणि हा अभूतपूर्व जाहीर भव्य नागरी सत्कार सोहळा घरातल्या सदस्यांनी केल्या सारखाच आहे यामुळे आम्हाला नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली आहे असे संबोधित केले.
सर्व डॉक्टरांच्या वतीने डॉ.विजय बंडगर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध जाचक अटी व नियमावलीत बदल करण्यासंदर्भात तसेच डॉक्टरांचे दैनंदिन प्रश्न आणि विविध विषयांवर सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आमदार डॉ.देशमुख यांना केले.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मिनाक्षी बनसोडे मॅडम सांगोल्याचे आमदार याविषयी कौतुक करताना म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब देशमुख हे पहिले आमदार असतील जे स्वतः शासनाच्या निरंतर शिक्षण कार्यक्रमाला (C.M.E.) हजर राहिले आणि सर्वांचे प्रश्न जाणून घेतले.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ.पिसे डायग्नोस्टिक सेंटर, सर्व डॉक्टर्स संघटना यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ.योगेश बाबर यांनी केले.