*राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या 19 विद्यार्थ्यांना सिल्वर कॅटेगिरी*

सांगोला (प्रतिनिधी):- 23 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सोलापूर येथे गणित प्रज्ञा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल
जाहीर झाला. या परीक्षेत silver Category प्रमाणपत्रासाठी राज्यातून इ. 5 वी साठी 355 व इ. 8 वी साठी 355 विद्यार्थी निवडले जातात. प्रशालेतील इ. 5 वी मधील 12 व इ. 8 वी मधील 7 विद्यार्थी असे एकूण 19 विद्यार्थ्याना silver category प्रमाणपत्र मिळाले. याबद्दल संस्था अध्यक्ष आदरणीय श्री. प्रबुद्धचंद्र झपके सर, प्राचार्य प्राध्यापक ग.ना. घोंगडे सर ,उपप्राचार्या सौ सय्यद मॅडम ,उप मुख्याध्यापक प्रा. श्री लक्ष्मण विधाते सर, पर्यवेक्षक श्री पोपट केदार , श्री बिभीषण माने , श्री अजय बारबोले यांचे हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष श्री. प्रबुद्धचंद्र झपके सर यांनी कौतुक केले.
या विद्यार्थ्यांना इ. 5 वी साठी श्री वैभव कोठावळे,श्री नागेश पाटील, सौ. विद्या जाधव, सौ. शितल कांबळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले तर 8वी साठी सौ. उज्वला कुंभार,श्री सचिन बुंजकर व श्री प्रदिप धुकटे या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्था बाह्य परीक्षा प्रमुख श्री शिवाजी चौगुले व प्रशाला बाह्य परीक्षा प्रमुख श्री नामदेव खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.