डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढ दिवसा निमित्त शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन*

सांगोला तालुक्याचे युवा नेते तथा महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढ दिवसा निमित्त शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथील जिमखाना विभागां मध्ये होणार आहे सदर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते चौथी , इयत्ता पाचवी ते सातवी , इयत्ता आठवी ते दहावी व जुनिअर कॉलेज अशा चार विभागां मध्ये स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे
प्रत्येक गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या विजेत्या खेळाडूंना श्री दीपक गोडसे यांच्या मार्फत आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे अशी माहिती डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार यांनी दिली.
तरी सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या प्रशालेच्या वतीने स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलांनी यांनी केले