महाराष्ट्र
क्यूब रूट फाउंडेशनच्या वतीने नाझरा विद्या मंदिर च्या दोन विद्यार्थिनींना वीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती प्रदान

नाझरा (वार्ताहर);- क्यूब रूट फाउंडेशन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग मंगळवेढा, वाटंबरे व बोरगाव हायवे यांच्या वतीने हायवे नजीक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.यावर्षी नाझरा विद्यामंदिर मधील प्रथम व द्वितीय क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरची शिष्यवृत्ती इचगाव येथील मुख्य कार्यक्रमात प्रधान करण्यात आली. ऋतुजा दिगंबर शिंगाडे व आरती सचिन बनसोडे या दोन विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपये चा चेक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास एन एच आय चे स्नेहील अग्रवाल, प्रकल्प अधिकारी सत्यनारायण गुर्जर, समन्वयक इंग्लिश शर्मा,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,चंद्रशेखर लिगाडे,सचिन बनसोडे आदी उपस्थित होते. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वश झपके,प्राचार्य बिभीषण माने आदी मान्यवरांनी केले.