बीएसएनएलने सातत्यपूर्ण , दर्जेदार सेवा द्यावी वारंवार ही सेवा खंडित ,विस्कळीत होत आहे या मागणीचे निवेदन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना देण्यात आल्याची माहिती शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आली.
संपूर्ण भारतात खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्जचे दर दुप्पट वाढल्याने सामान्य नागरिक/ ग्राहक बीएसएनएलच्या सेवेकडे पुन्हा आकर्षित झाला आहे पण पूर्ण क्षमतेने देशभरात ही सेवा मिळत नसल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील, ग्रामीण भागातील नेटवर्क अपुरे पडत आहे कॉल ड्रॉप होणे,त्यातच महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक टॉवर बंद स्थितीत असल्याने रेंज मिळत नाही , इंटरनेट सेवेचा बोजवारा उडत आहे . त्यामुळे सर्वसामान्य लोकांची शासकीय योजनांची कामे इंटरनेट अभावी ठप्प होत आहेत. त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे दरमहा टेलिफोनच्या आकारणी रिचार्ज व इतर भाडे ग्राहकांना सुरू आहे नेटवर्क नसल्याने समस्या वाढत आहेत या बीएसएनएल कंपनीच्या नवीन जोडणी,सिम कार्डला देश,राज्यसह सोलापूर जिल्ह्यात ग्राहकांची मागणी वाढली आहे त्यामुळे महिन्याभरात बीएसएनएलची ग्राहक संख्याही वाढली आहे या कंपनीची अपुरी यंत्रणा व नियोजनाचा अभाव यामुळे नेटवर्क वारंवार खंडित होत आहे तरी या कामी संबंधित सोलापूर बीएसएनएलच्या अधिकारी ,विभागास आदेश देऊन ही सेवा सातत्यपूर्ण व दर्जेदार द्यावी अशी ग्राहकांची मागणी होत आहे.
या निवेदनाच्या प्रती विभागीय जनरल मॅनेजर, भारतीय संचार निगम लिमिटेड पुणे,सोलापूर,चेतनसिंह केदार- सावंत सदस्य ,सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती यांनाही देण्यात आल्या आहेत. अन्यथा अशोक कामटे संघटना स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार आहे यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————————————-
अशोक कामटे संघटनेचे निवेदन मिळाले असून या संदर्भात केंद्रीय दूरसंचार मंत्री,
बीएसएनएलच्या वरीष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दर्जेदार सेवा देण्याविषयी सूचना केली आहे सर्व सामान्य लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न संघटनेने वाचा फोडल्याने तात्काळ सुधारणा होऊन सदरचा विषय मार्गी लावणार.
चेतनसिंह केदार -सावंत
सदस्य:-सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती
————————————————————————-