महाराष्ट्र

भारतीय स्त्री शक्ती संचलित ,मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राकडून मेडशिंगी येथे महिला मेळावा   

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत पर सत्कार करण्यात आला प्रथमता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मुजमुले सर यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय या योजनेचा आपल्या पुढील आयुष्यात कसा व कोठे उपयोग होतो. व आपल्याला पुढे जायचे असेल तर n.s.s हे एक चांगले व्यासपीठ आहे . सर्व विद्यार्थ्यांनी पुढे येवून बोलले पाहिजे तसेच n.s.s च्या विद्यार्थ्यांनी नम्र असायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भा.स्त्री.शक्ती संचलित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र शाखा सांगोल्याच्या अध्यक्षा. अॅड. राजेश्वरी केदार मॅडम यांनी जमलेल्या महिलांना व विद्यार्थ्यांना n.s.s विषयी माहिती दिली. तसेच जमलेल्या महिलांना आता लाडकी बहिण योजना सुरु झाली आहे . त्या योजनेचे आलेले पैसे आपण योग्य रित्या गुंतवणूक केली तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा महिलांना मिळेल तसेच पोस्टा मधील महिला सन्मान पत्र या योजने विषयी जमलेल्या महिलांना सविस्तर माहिती दिली . तसेच महिलांनी आता उन्हाळा येत आहे त्यामुळे उन्हाळी पदार्थ बनवून यात्रेमध्ये आपला छोटासा स्टॉल लावून त्या पदार्थाची विक्री केल्यास त्यातून भरपूर प्रमाणात नफा मिळू शकतो तसेच महिलांना भारतीय स्त्री शक्ती ही संघटना महिलानसाठी गावोगावी खेडोपाडी जावून कसे काम करते त्याबद्दल सविस्तर माहिती दिली . तसेच महिलांना कुटुंबा मध्ये कोणतीही अडचण असेल तर त्यांनी मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राशी संपर्क करावा असे त्यांनी आवाहन केले. तसेच महिलांना विधी सेवा समितीची माहिती दिली.

त्यानंतर सौ. मोरे  मॅडम यांनी उमेद या बचतगटाविषयी माहिती दिली. बचतगटातून महिलांना आर्थिक स्वावलंबन कसे व्हायचे गटातील १० महिलांनी मिळून जर एखादा छोटा – मोठा व्यवसाय सुरु केला तर उमेद च्या माद्यमातून २० लाखापर्यंत व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकते व ते कसे घ्यायचे याबद्दल महिलांना सविस्तर माहिती दिली.

डॉ. गणपतरावजी देशमुख महाविद्यालय सांगोला येथील प्रा. डॉ. सिमा गायकवाड मॅडम यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक महिलांनी शेतीभूधारक व्यवसाय केला पाहिजे त्यातूनही कमी वेळात मोठ्या प्रमाणात महिलांना अधिक नफा मिळू शकतो असे त्यांनी सांगितले

कार्यक्रमाच्या अध्यक्षा . सांगोला सहकारी सूतगिरणीच्या चेरमन कल्पनाताई शिंगाडे मॅडम यांनी जमलेल्या महिलांना आपण छोटा मोठा उद्योग करताना आपले कुटुंब ही जपले पाहिजे महिलांना जर उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास जिद्द व चिकाटी या सर्व गोष्टी असायला हव्या असे त्यांनी सांगितले.

भारतीय स्त्री शक्ती संचलित , मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या सहसचिव प्रा.डॉ. चित्रा जांभळे मॅडम यांनी कार्यक्रमासाठी जमलेल्या प्रमुख पाहुण्याचे व महिलांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मुजमुले सर, भा.स्त्री.शक्ती संचलित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र शाखा सांगोल्याच्या अध्यक्षा. अॅड. राजेश्वरी केदार मॅडम, सौ. मोरे  मॅडम,सांगोला  महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भोसले सर ,शिंदे सर ,  डॉ. गणपतरावजी देशमुख महाविद्यालय सांगोला येथील प्रा. डॉ. सिमा गायकवाड मॅडम, सांगोला सहकारी सूतगिरणीच्या चेरमन कल्पनाताई शिंगाडे मॅडम, भारतीय स्त्री शक्ती संचलित , मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या सहसचिव प्रा.डॉ. चित्रा जांभळे मॅडम भा.स्त्री.शक्ती संचलित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्रचे समुपदेशक श्री. गणेश बाबर तसेच मेडशिंगी गावच्या सरपंच व गावचे प्रतिष्ठीत नागरिक, सांगोला महाविद्यालय सांगोला येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १०० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनी व मेडशिंगी गावातील ८० हून अधिक महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button