सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील लांडगे मळा येथील सुरेश महादेव लांडगे यांचे काल मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 59 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. तिसरा दिवस विधी उद्या गुरुवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता वाढेगाव, नाका सांगोला येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.