महाराष्ट्र

अखेर राजेवाडीतून पाणी सुटले…;  आम.डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वारंवारच्या पाठपुराव्यास अखेर यश

सांगोला:-सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईची जाणवत असताना सांगोला तालुक्यासाठी राजेवाडी तलावातून पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री नाम.जयकुमार गोरे यांच्याकडे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी लावून धरली होती. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वारंवार पाठवपुराव्याची व सततच्या मागणीची दखल घेऊन अखेर आज राजेवाडी तलावामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे पाणी मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यासह आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे परिसरातील शेतकऱ्यांमधून आभार मानण्यात येत आहेत.

म्हसवड (राजेवाडी) तलावामध्ये सध्या पाणी शिल्लक असताना उन्हाळा हंगामाचे आवर्तन व त्याचे प्रकटन केले नाही. सदर तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे लोकांनी तलावाच्या पाण्याच्या भरवशावर जनावरांसाठी चारा पिके केले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी उन्हाळा हंगामाची पिके घेतली आहेत. सदर उन्हाळा हंगामाचे आवर्तन न मिळाल्यास जनावराच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.धरणाची क्षमता 1692 एम.सी. एफटी आहे. सध्या धरणात 900 एम.सी.एफ टी पाणीसाठा आहे. तरी पिण्याच्या पाण्यासाठी व जनावराच्या चारासाठी उन्हाळा हंगामाच्या आवर्तन प्रकटन करून उन्हाळा हंगामासाठी राजेवाडी तलावातून  पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन वारंवार मागणी केली होती.

राजेवाडी तलावाला हक्काचे पाणी मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीची दखल घेऊन राजेवाडी तलावातून पाणी सोडण्यात आले असून सांगोला तालुक्यातील  खवासपूर, कटफळ (दुधाळवाडी), लक्ष्मीनगर, अचकदाणी व  आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी, दिघांची, उंबर गाव येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यानी जास्तीत जास्त रीतसर पाणी मागणी अर्ज करावेत असे आवाहन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button