मा. संजीवनी केळकर यांचा ‘स्नेहालय परिवार’तर्फे सन्मान!

अहिल्यानगरच्या ‘स्नेहालय परिवार’तर्फे नुकताच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या संस्थापिका मा. डॉ .संजीवनी केळकर यांना, त्यांच्या समाजसेवेतील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले! समाजसेवेच्या त्यांच्या योगदानाची ही मोठी पोच पावतीच म्हणावी लागेल!
डॉ. संजीवनी केळकर या माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेच्या संस्थापिका असून सध्या त्या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरण
कार्यक्रमा अंतर्गत महिलांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन याबाबत संस्थेच्या माध्यमातून खूप कामे झाली!
तसेच महिलांबरोबरच, ग्रामीण विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून बालवाडी ते 12 पर्यंत वर्ग सुरू केले!
सांगोला व पंढरपूर तालुक्यात जलसंधारणाची
कामेही त्यांच्या नेतृत्वाखाली झाली.
बचतगट, आरोग्य शिबिरे, साक्षरता वर्ग आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन यांद्वारे त्यांनी अनेक महिलांना स्वावलंबी बनवले आहे!
त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आरोग्य तपासणी आणि मोफत व स्वस्त उपचार शिबिरे हे आणि इतर आरोग्य उपक्रम राबवले जातात!मागील वर्षी त्यांना नागपूर येथे अत्यंत प्रतिष्ठेचा केंद्र शासनाचा,राष्ट्रीय शिक्षा भूषण पुरस्कारही मिळाला आहे!त्यांच्या कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील दखल घेतली गेली आहे!त्यांचा सन्मान करणारी स्नेहालय ही संस्था देखील वंचितांसाठी आशेचा किरण आहे.
१९८९ मध्ये डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्थापन केलेली स्नेहालय ही अहिल्यानगरमधील संस्था एचआयव्ही बाधित, लैंगिक शोषणग्रस्त, तस्करीच्या बळी ठरलेले आणि एलजीबीटी समुदायासाठी कार्य करते.
स्नेहनिर्माण – एचआयव्ही बाधितांचे पुनर्वसन
स्नेहांकुर – अनाथ मुलांसाठी दत्तक केंद्र
शिक्षण प्रकल्प – जागतिक स्तरावर नावाजलेली शाळा
हे स्नेहालय संस्थाचे मुख्य उपक्रम आहेत.
दरवर्षी १५,००० हून अधिक लोकांना मदत करणारी ही संस्था समाजसेवेतील एक आदर्श आहे. अशा संस्थेकडून डॉ संजीवनी केळकर यांचा सन्मान होणे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.