न्यू इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थांचे एन.एम.एस परीक्षेत उज्वल यश

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल या नामांकित प्रशालेतील इयत्ता आठवी साठी असणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत तेरा विद्यार्थी पात्र झाले. याप्रसंगी या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा. अशोकराव शिंदे, प्रा.दिपक खटकाळे,उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव, उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे, पर्यवेक्षक तात्यासाहेब इमडे सर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आर्यन राजाराम इरकर, महेश आबासो राऊत, सोहम निलेश पोरे, मयुरी ईश्वर तरकसबंद, वैष्णवी विजय माने त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी विश्वजित विकास गायकवाड, सानिका विजय केदार, वैष्णवी सुनिल शिनगारे, संचिता लहू दिघे, अक्षदा हणमंत कदम, रितेश विलास दिघे, प्रणाली दत्तात्रय मिसाळ, श्रेयश सतिश पवार, सृष्टी सचिन सावंत, प्रसाद हरिदास शिनगारे, प्राची हणमंत सुरवसे, अनुष्का किसन गुंगे, जानकी दत्तात्रय सावंत
या सर्व गुणवंत विद्यार्थांचा व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.यावेळी मार्गदर्शक शिक्षक एन.एम.एस विभाग प्रमुख अमोल पाकले सर, कोमल भंडारे मॅडम, सागर वाघमारे सर , अनिल पवार सर, राणी आदलिंगे मॅडम, घोगरे मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल पाकले सर यांनी केले तर आभार सागर वाघमारे सर यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख, सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे, प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.