महायुती सरकारने प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्य उपचारासाठी पाच लाख रुपयां च्या निधीची केली तरतूद: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

सांगोला /प्रतिनिधी : महायुती सरकार च्या माध्यमातून राज्यभर महाआरोग्य शिबिरे सुरू असून त्याचा राज्यातील सर्वच घटकातील लाखो रुग्णांना लाभ मिळत आहे. सरकारकडून सर्वसामान्यांच्या गंभीर स्वरूपाच्या आजारासाठी प्रत्येकी पाच लाखांची वैद्यकीय मदत दिली जात आहे. मागील काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांसाठी 4500 कोटी रुपयांचा निधी खर्च करून लाखो रुग्णांचा जीव वाचवला आहे. सांगोला येथेही सर्वरोग निदान शिबिर व उपचार करणारे महा आरोग्य शिबिर संपन्न होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. सांगोला तालुक्यासाठी शिवसेनेच्या वतीने सर्व सोयीनिमित्त अशी रुग्णवाहिका देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून महाआरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषधे वाटप, भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांच्या दृष्टीने खूप मोलाचे सहकार्य केले असून त्याचा अनेक गरजू रुग्णांना लाभ होत आहे. असे विचार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगोला येथे महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
सांगोला येथे गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सर्वरोग निदान शिबिर, महाआरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिर अशा महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. या महाआरोग्य शिबिरात 200 रुग्णांची तपासणी- उपचार करण्यात आले तसेच 800 रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिर प्रसंगी माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवाजी सावंत सर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर विभाग प्रमुख सतीश सावंत, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी, अरविंद केदार, युवानेते दिग्विजय दादा पाटील,सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, विजयदादा शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, गुंडादादा खटकाळे, विजय इंगवले, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते विविध पक्षाचे मान्यवर ,महाआरोग्य शिबिरात समाविष्ट झालेले विविध हॉस्पिटलचे नामवंत डॉक्टर विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर , आशा वर्कर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकार हे सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देत असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य व मदत करीत आहे. गोरगरिबांना आर्थिक अडचण भासू नये यासाठी शासनाने सर्वतोपरी मतीचा हात दिला असून अनेकांचे प्राण वाचवण्यात हे महायुती सरकार यशस्वी ठरले आहे. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मा. खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्य फाउंडेशनच्यावतीने मोफत सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिरे सुरू असून सांगोल्यामध्ये सांगोला महाविद्यालय येथे हे महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. या महाआरोग्य शिबिरासाठी सोलापूर जिल्हा व जिल्हाबाहेरील अनेक नामवंत हॉस्पिटल व त्यांचा डॉक्टर स्टाफ सहभागी झाले व महाआरोग्य शिबीर यशस्वी केले. शिबिराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आजारावरती तपासणी व औषधोपचार व मेडिसिन देऊन रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली.
या आरोग्य शिबिरात मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप शिबिर, भव्य रक्तदान शिबिर तसेच सर्व प्रकारच्या आजारावरती तपासणी व उपचार करण्यात आले. हे महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर पार पाडण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीशभाऊ सावंत, तालुकाप्रमुख सुरज काळे, शहरप्रमुख आदित्य शेगावकर यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व मान्यवरांच्या हस्ते सांगोला येथे संपन्न झालेल्या विविध कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने चौक पोलीस बंदोबस्त ठेवून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यासाठी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे यशस्वीपणे पूर्ण पूर्ण केली.