उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या लोगोचे लोकार्पण व विविध मागण्यांचे निवेदन

राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई साहेब त्याचबरोबर मोहोळचे आमदार राजू खरे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख व सर्व आजी माजी आमदारासमवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सांगोल्यात आले होते.
सकाळपासूनच सांगोल तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक बंधू व भगिनी साहेबांच्या भेटीसाठी व निवेदन देण्यासाठी तयारीत होते. त्याप्रसंगी मदतीला धावून आलेले उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमूख व आमचे मार्गदर्शक मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मंत्रालयीन समन्वय समितीचे सदस्य पुणे बोर्डाचे संचालक डॉ. बापूसाहेब आडसूळ सर यांच्या मदतीने सर्व शिक्षक सांगोला महाविद्यालय या ठिकाणी मंगेशजी चिवटे यांच्या मदतीने आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टप्पा वाढीचे निवेदन देण्यात आले..
त्यानंतर पुन्हा सांगोला विद्यामंदिर सांगोला या प्रशालेच्या पटांगणामध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम व सभा सुरू झाली त्या सभेच्या प्रसंगी आदरणीय मुख्यमंत्र्याची स्वीय सहाय्यक व उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख, डॉक्टर श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन यांचेमार्फत राज्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना या फलकाचे अनावरण करण्यात आले व त्यांना टप्पा वाढीच्या निवेदना सोबत टप्पा वाढ देणे राज्यातील शिक्षकांना किती महत्त्वाचे आहे. हे सांगितले त्यानंतर त्यांनी सांगितले.लवकरच करतो हा विषय पूर्णपणे मला माहीत झाला आहे.
तद नंतर शंभूराजे देसाई यांनाही या विषयाची कल्पना दिली कॅबिनेटमध्ये आपण हि हा विषय लावून धरा व मार्गी लावा याप्रसंगी मौलाना वस्तानवी उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सोलापूरचे सरफराज बलोलखान स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे संपर्कप्रमुख त्याचबरोबर जिल्हा संघटक जेटफुल सर व त्यांची टीम,नराळे विद्यालयाचे सहशिक्षक प्रशांत जैनजांगडे यशराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश पुकळे ,जाधव सर ,अविनाश लांडगे सर, मॉडर्न हायस्कूल घेरडीचे प्राध्यापक एम.बी.खरात सर ,हातीद प्रशालेच्या मोरे मॅडम , हनुमान प्रशालेचे जेष्ठ शिक्षक धनंजय लांडगे सर, मंगळवेढा दामाजी हायस्कूलचे मंगळवेढेकर सर जवळा कॉलेजचे तोडकर मॅडम व माळी सर,एके पाटील सर सह्याद्री प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. पवार मॅडम बागलवाडी प्रशालेचे जाधव सर पवार सर यलमार मंगेवाडी चे गारळे सर भडंगे सर आदर्श इंद्रजीत प्राथमिक शाळेचे पवार सर, स्वामी विवेकानंद प्रशालेचे मासाळ सर, न्यू इंग्लिश स्कूल सांगोल्याचे सर्व प्राध्यापक गव्हाणे सर खटके सर व अन्यही इतर परीक्षक व बंधू भगिनी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले व या विषयाची दाहकता आणखी शासनापर्यंत पोहोचवली.