माणगंगा नदी दुबार स्वच्छतेचा शुभारंभ.

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातून १६५ कि.मी. वाहणाऱ्या माणगंगेची माणगंगा भ्रमण सेवा संस्था, श्री. बृहद भारत समाजसेवा संस्था, नदीकाठची गावे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहयोगातून माणगंगा नदीच्या दुबार स्वच्छतेचा शुभारंभ वासूद, अकोला, वाडेगाव व बलवडी इ. ठिकाणी नुकताच सुरू करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे, तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव, उद्योगपती सुदामजी मोरे, साहित्यिक पुरषोत्तम फुले मामा, वासुदचे सरपंच संभाजी चव्हाण, अकोल्याचे सरपंच शशिकांत गव्हाणे, माजी सरपंच किशोर शास्त्रे, चंद्रकांत सावंत, डॉ. अशोकराव शिंदे, विजय भोरे, रणजीत सावंत, कृषी विभागाचे बाळासाहेब सावंत, मनोज जाधव, बाळासाहेब केदार, राजेंद्र शिंदे, भगवान भोरे, तानाजी केदार, भगवान केदार तसेच वाडेगाव येथे सरपंच सौ. कोमल डोईफोडे, सुरेश डोईफोडे, उपसरपंच शिवाजी दिघे, माजी सरपंच नंदकुमार दिघे, डॉ. धनंजय पवार, दत्ता पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल घोंगडे, दत्तात्रय शिनगारे, सागर ऐवळे, सौ. वसमळे, सौ. प्रतिभा भगत, दीपक दिघे, सोमनाथ वसमळे, माजी उपसरपंच अनिल दिघे, आण्णासो. गस्ते, दादासो ऐवळे, प्रदीप इंगोले, ज्ञानेश्वर तंडे, नवनाथ दिघे, अमर माने, गुंडा साळुंखे, आप्पा कोळी, नितीन गेजगे इ. सह अनेक ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे यांनी माहिती देताना सांगितले की, चार वर्षापूर्वी लोकसहभागातून ७५ कि.मी. माण नदीपात्र व १८ बंधारे स्वच्छ केले होते. चिलार बाभळीमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आत्तापर्यंत लोकसहभागातून अडीच कोटीहून अधिक खर्च केला आहे. ही नदीची स्वच्छता नाही टिकवली तर नदीची आणखी दुरावस्था होईल, म्हणून दुबार स्वच्छता हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव मॅडम यांनी शासकीय योजनेतून नद्या व ओढे यासंबंधी ज्या योजना राबवता येतील त्या राबवून तालुक्यातील नद्या अधिक स्वच्छ कशा राहतील याबाबत कृषी कार्यालय लक्ष देईल. याप्रसंगी सुदाम भोरे, डॉ. धनंजय पवार, दीपक दिघे इत्यादींनी आपले विचार व्यक्त करून नदी स्वच्छतेच्या कामामध्ये सहकार्य करण्याचे मान्य केले. शेवटी ग्रामपंचायत सदस्य राहुल घोंगडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.