सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या कार्यकारणीची मीटिंग संपन्न

सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या कार्यकारिणीची मीटिंग तालुका अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला कार्यालयात संपन्न झाली. यावेळी सुरुवातीस सेवानिवृत्त शिक्षक व त्यांचे मयत नातेवाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर मीटिंगमध्ये तालुक्यातील एम एस सी आय टी वेळेत न झालेल्या शिक्षकांचे केलेली कपात कोर्टाचे आदेश असताना सुद्धा अद्याप त्यांना रकमा प्राप्त झाल्या नाहीत त्याबद्दल सांगोला तालुक्यातील बहात्तर शिक्षकांची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा संघटनेने बोलावलेल्या सोलापूर येथे बैठकीस हजर राहण्याचे आवाहन संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शंकर सावंत यांनी केले. तसेच संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे व ज्येष्ठ संचालक शंकरराव सावंत यांना सीबीएस न्यूज चॅनेल चा आदर्श सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान संघटनेचे उपाध्यक्ष जयवंतराव नागणे व ज्येष्ठ संचालक विलास नलवडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
महूद ता. सांगोला येथील सेवानिवृत्त शिक्षक महादेव चौगुले यांचा मोबाईल हरवला व तो चोपडी सोनेवाडी येथील विद्यार्थिनी सानिका बापूबाबर खिला सापडला व तिने तो प्रामाणिकपणे परत केला त्याबद्दल तिचा विषय सत्कार संघटनेचे उपाध्यक्ष जयवंतराव नागणे यांच्या शुभहस्ते व विद्यार्थिनीचे मामा अमोल केदार यांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सहसचिव दत्तात्रय खामकर यांनी सानिका बाबर हिच्या प्रामाणिकपणाबद्दल पुढील शैक्षणिक वर्षाच्या लागणारे लेखन साहित्य व सर्व खर्च देण्याची जबाबदारी घेतली. सदर प्रसंगी संघटनेचे संचालक एकनाथ जावीर, गंगाराम इमडे, अरुण वाघमोडे, लक्ष्मण सावंत इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहसचिव दत्तात्रय खामकर तर आभार विलास नलावडे यांनी मानले.