राजमाता पतसंस्था कोळे ता सांगोला यांचे वतीने विविध क्षेत्रातील नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान संस्थेचे चेअरमन कुंडलिक आलदर, व्हा. चेअरमन जगन्नाथ माने, मा . जि प सदस्य गजेंद्र कोळेकर, मा. सरपंच शहाजी हातेकर, उद्योगपती किरण भाऊ पांढरे, सुरेश आलदर, तुकाराम आलदर पुढारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यामध्ये भारत देशाची सेवा करून निवृत्त झालेले देवेंद्र आलदर, डाळिंब व्यवसायात पुरस्कार प्राप्त झालेले नाना सो माळी, अण्णा गडदे, पोलीस भरतीचे कुंडलिक सरगर, जि.प. सांगली येथे औषध निर्माण अधिकार पदी नियुक्त झालेले प्रसाद बोधगिरे इत्यादी मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
सदर प्रसंगी सोपान दाजी कोळेकर, नामदेव मदने, सोमनाथ शेटे, संभाजी गोडसे, रमेश कोळेकर, दादासो आलदर, काशिनाथ आलदर, अशोक आलदर, उदय माळी, ईश्वर घाडगे, बाळू बोधगिरे, शिक्षक नेते मारुती सरगर, फिरोज आतार, काकासो पांढरे, रामचंद्र आलदर, संस्थेचे मॅनेजर समाधान शिंदे, कर्मचारी तात्यासाहेब हातेकर, उमेश माळी, बाबासो गोडसे इत्यादी उपस्थित होते.