गद्दार कृषिमंत्री अब्दुल सत्तार याने तात्काळ राजीनामा द्यावा : सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणरागिणी आक्रमक

सांगोला : खोक्याच्या सहकार्याने ओके झालेल्या सरकार मधील कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देवून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बाबत बेजबाबदारपणे वक्तव्य केले आहे. याची राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वेळीच दाखल घेवून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्री पदापासून दूर करावे. असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रांतिक उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड दिला.यावेळी राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढलेल्या वक्तव्याचा निषेध करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवराय,शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा विसरलेले जबाबदार महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्यावर अर्वाच्य भाषेत बेताल वक्तव्य केले. याचा निषेध करताना जयमालाताई बोलत होत्या खासदार सुप्रियाताईंचा अब्दुल सत्तार यांनी ज्या शिरवाळ भाषेत एकेरी उल्लेख केला ही बाब गंभीर असून यामुळे तमाम महिलांचा अपमान झाला आहे.अश्या व्यक्तींना राज्याच्या कारभारा पासून लांब ठेवणे महत्वाचे असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली पाहिजे.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रसच्या महिला रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील,महिला अध्यक्षा सखुताई वाघमारे, युवक अध्यक्ष अनिल खटकाळे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत कारंडे, महादेव पवार, विजय पवार, बाळासाहेब शिंदे, सुनील साळुंखे, दिलीप नागने, यशवंत खबाले, चंद्रकांत बागल, योगेश खटकाळे, माजी सभापती अनिल मोटे, सूर्याजी खटकाळे, सतीश काशीद, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी हरीहर, राज मिसाळ, मच्छिंद्र माने, गिरीश गायकवाड, संतोष पाटील, साहिल इनामदार, सुरेश गावडे, अनिल सुतार, जयवंत नागणे, शिवाजी जावीर, पोपट खाटीक, दीपक जाधव, अजित गोडसे, शिवानंद पाटील, भूषण बागल, असलम पटेल, राहुल ढोले, सखुबाई वाघमारे, शोभा खटकाळे, सरस्वती रणदिवे, शशिकला खाडे, शकुंतला खडतरे, सुजाता कांबळे, सरपंच मंगल भुसे, हसीना मुलानी, मनीषा मिसाळ, जयश्री पाटील, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट : राज्याचे कृषी मंत्री यांनी आमच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे बद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे.त्यांनी अर्वाच्य भाषेत ताईंचा एकेरी उल्लेख करून तमाम महिलांचा अवमान केला आहे.ही बाब पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने काळीमा फासणारी आहे. याची सध्याच्या सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे.
मा.आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील



