जिल्हा सोसायटीच्या कारभारावर सांगोल्यातील संचालकानी आपला वेगळा ठसा उमटवावा – दीपक आबा साळुंखे पाटील

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कारभार अत्यंत आदर्श असून नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सांगोला तालुक्यातील जे तीन संचालक निवडून आले आहेत त्यांनी आपल्या सांगोला तालुक्याचा पारदर्शी कारभाराचा एक वेगळा ठसा जिल्हा सोसायटीच्या कारभारावर उमटवावा व आपली छाप तेथे पाडावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मा. आ. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सह पतसंस्थेचे नुतन संचालक गुलाबराव पाटील, रवींद्र पाटील, श्रीम. शीतल चव्हाण नागणे मॅडम यांच्या सत्कारप्रसंगी जवळे येथे ते बोलत होते.जिल्हा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये गुरुसेवा पॅनलच्या उमेदवारांनी भरभरून यश संपादन केले असून यापुढेही परंपरा अशीच कायम राहावी असे आवाहनही त्यांनी पुढे केले.
जिल्हा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये गुरुसेवा पॅनेलचे उमेदवार यशस्वी झाल्यामुळे दीपक आबांच्या शुभ हसते सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी जिल्हा सोसायटीची आर्थिक स्थिती, कर्जमर्यादा,सभासद लाभ योजना याविषयी सविस्तर माहिती नूतन संचालकांकडून जाणून घेतली.
प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री. सुहास कुलकर्णी यांनी केले. सत्काराला उत्तर देताना श्री. गुलाबराव पाटील यांनी दीपक आबांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवून पतसंस्थेचा कारभार यापेक्षाही सभासदाभिमुख करून सांगोल्याचे नावलौकिक वाढवू असे विचार व्यक्त केले. आदर्श शिक्षक समितीचे नेते अशोक पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी विकास साळुंखे पाटील, संजय काशिद पाटील, अल्लाउद्दीन तांबोळी, उध्दव नागणे, विलास डोंगरे, अंकुश गडदे, विश्वनाथ जाधव, मधुकर भंडारे, महादेव नागणे, तानाजी साळे, रफिक शेख,रफिक मुलाणी, वसंत बंडगर, अविनाश कुलकर्णी, कैलास मडके,मनोहर इंगवले, मारुती काळेबाग, विकास वाघमारे, नागेश हवेली, मनोहर पवार, विक्रम सोनवणे, विश्वजित देशमुख, गणेश वनखंडे, दर्याबा इमडे, संतोष चौगुले, साहिल खलिफा, सचिन बागल, श्रीमंत गावडे, अमर कुलकर्णी, पंकज मसगौडे, अशोक शिंदे सह गुरुसेवा पॅनलमधील सर्व संघटनांचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.