स्वदेशी खेळामुळे विद्यार्थ्यांना शाळाबाहेरील शिक्षणाचा अनुभव आला – संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये शिक्षण सप्ताहातील तिसरा दिवस हा "क्रीडा दिवस" विविध स्वदेशी खेळ घेऊन साजरा.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भारत देशातील सर्व शाळांमध्ये 22 जुलै ते 28 जुलै हा “शिक्षण सप्ताह” साजरा करण्याबाबत केंद्रित शिक्षण मंत्रालयामार्फत सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये 22 जुलै रोजी “अध्ययन-अध्यापन दिवस” हा विद्यार्थ्यांना थोर समाज सुधारकांची माहिती देऊन साजरा करण्यात आला.
23 जुलै रोजी “मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस” विद्यार्थ्यांना गणितीय संख्या विचारून व वर्गामध्येच विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन घेऊन साजरा करण्यात आला. तर 24 जुलै रोजी सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप कबड्डी यासारखे विविध स्वदेशी खेळ घेण्यात आले. या खेळाडूंचा संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांसमोर सन्मान करण्यात आला.
विविध क्रीडा प्रकारांपैकी खो-खोच्या सामन्याचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला चे प्राचार्य राकेश माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संस्था सदस्य प्राधिक खटकाळे व उपप्राचार्य प्रा संतोष जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्वतः क्रीडा शिक्षक प्रा. हिम्मत साळुंखे, श्री सचिन हजारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार, प्रा कामाजी नायकुडे, प्रा अरुण बेहेरे, प्रा. हनुमंत श्रीराम, प्रा.भाऊसाहेब घुटुकडे व प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.देवेन लवटे यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या समवेत खेळून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
सर्व खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतामध्ये स्वदेशी खेळामुळे विद्यार्थ्यांना शाळाबाहेरील शिक्षणाचा अनुभव घेता आला. नेहमीच चार भिंतीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना स्वदेशी खेळामुळे शाळाबाहेर शिक्षणाचा अनुभव घेता आला. याप्रसंगी क्रीडा प्रमुख सचिन हजारे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वदेशी खेळाचे जीवनातील महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाचे प्राचार्य प्रा.केशव माने, संस्था सदस्य प्रा. डॉ.अशोकराव शिंदे, प्रा. दिपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर,उप मुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे उपप्राचार्य प्रा संतोष जाधव पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर श्री दशरथ जाधव सर श्री तातोबा इमडे सर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.