सावे माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट हा ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व प्रमुख पाहुणे सावे शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सावे या संस्थेचे सचिव श्री मुरलीधर इमडे, संचालक गंगाराम इमडे, विठ्ठल सरगर व सावे ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व पंचप्राण शपथ घेण्यात आली.
विद्यालयातील काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सावे गावातील विविध परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभाग मध्ये असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर म्हणून नियुक्ती झालेले आण्णा महारनवर तसेच जलसंपदा विभाग कालवा निरीक्षक पदी निवड झालेले अक्षय माने, तलाठी पदी निवड झालेली शशिकला बंडगर व साईराम एजन्सी सांगली या मध्ये बँक मॅनेजर पदी निवड झालेले संदीप गडदे यांचा सत्कार शाल, श्रीफळ व गुलाब फूल देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .
इयत्ता दहावी मध्ये दैदिप्यमान यश मिळवलेल्या कुमारी मनीषा हरिदास बंडगर ,पायल नेताजी माने, वैष्णवी प्रकाश पांढरे व समीक्षा हरिदास पांढरे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाब फूल देऊन करण्यात आला. त्यानंतर आमचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री गणपत गुंडा कुंभार गुरुजी यांच्यातर्फे इयत्ता आठवी, नववी व दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना वह्या व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 17 वर्षे वयोगट 61 किलो वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल कुमारी सानिका सचिन लवटे हिचा सत्कार संस्थेचे संचालक गंगाराम इमडे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच ह. भ. प. साखरूबाई वालाप्पा मेटकरी यांचे स्मरणार्थ मेजर एकनाथ मेटकरी यांचे कडून इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यीनीस एक हजार रुपयेचे पारितोषिक कुमारी मनीषा हरिदास बंडगर हिला सावे गावचे माजी पोलीस पाटील शिवाजी पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सावे गावचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी वाघमोडे यांचे तर्फे एक हजार रुपयाचे पारितोषिक कुमारी मनीषा हरिदास बंडगर हिला देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्यातर्फे विद्यालयात प्रथम क्रमांक येणाऱ्या मनीषा बंडगर हिला पाचशे रुपये, द्वितीय क्रमांक पायल माने हिला तीनशे रुपये व तृतीय क्रमांक वैष्णवी पांढरे हिला दोनशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांच्यातर्फे इंग्रजी विषयात 100पैकी 94 गुण घेऊन विद्यालयात प्रथम आलेली कुमारी समीक्षा पांढरे हिला 501 रुपये ,द्वितीय क्रमांक पायल माने 501रुपये, तृतीय क्रमांक वैष्णवी पांढरे 501 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री बर्गे सर यांनीही इयत्ता दहावी मध्ये मराठी विषयात 100 पैकी 93 गुण घेऊन प्रथम आलेली कुमारी वैष्णवी पांढरे हिला 501 व द्वितीय क्रमांक 100 पैकी 91 गुण कुमारी समीक्षा पांढरे तिला 501 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्वर्गीय आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 100 मीटर धावणे ,स्लो सायकल स्पर्धा, क्रिकेट, निबंध ,चित्रकला, हस्ताक्षर,खो-खो, कबड्डी, वकृत्व स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची ,गोणी उडी इत्यादी स्पर्धेचं प्रशस्तिपत्रक वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मेजर एकनाथ मेटकरी यांनी स्वातंत्र्य दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास मेजर अजय सुतार, माजी सरपंच हरिदास सरगर , माजी पोलीस पाटील श्री शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री समाधान इमडे, संतोष माने ,सुरेश पारसे, विद्यमान डेपुटी सरपंच संतोष माने, माजी सरपंच विक्रम शेळके, गणपत कुंभार गुरुजी, युवा नेते शिवाजी शेजाळ सर ,जगन्नाथ गावडे, सावे विकास सोसायटीचे चेअरमन किसन शेळके ,पोपट बंडगर, जालिंदर पारसे ,बापू इमडे ,प्रसिद्ध उद्योजक बाबासाहेब शेळके, युवा नेते प्रदीप सरगर, ग्रामपंचायत सदस्य विकास इमडे,विठ्ठल दुधाळ, ग्रामपंचायत सदस्य वसंत रड्डी, भारत शेजाळ, सचिन लवटे,विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी ,प्रतिष्ठित नागरिक ,पालक व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी व सावे गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर व आभार प्रदर्शन श्री अनुसे सर यांनी केले.