जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे बालदिंडी उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची बालदिंडी काढणेत आली यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषा करून दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते
विठू नामाचा गजर करत ही दिंडी गावातील हनुमान मंदीरात विसावली तेथे सर्व विद्यार्थ्यांनी भजन कीर्तन केले तसेच फुगडी व रिंगण केले
या दिंडीत पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.माता पालक गटाच्या सौ ज्योती युवराज राऊत सौ ज्योती अतुल राऊत सौ अमृता सरगर सौ वृषाली राऊत सौ हिना कसबे सौ मोहिनी इंगवले आदी माता पालक उपस्थित होते सर्वांनी विद्यार्थ्यांबरोबर विविध खेळ खेळून आनंद घेतला शाळेच्या वतीने सर्व वारकरी यांना केळी वाटप करण्यात आले
सदर दिंडी यशस्वी होण्यासाठी शाळेतील उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर सर यांनी व श्री महादेव कमळे गुरुजी यांनी परिश्रम घेतले तर सर्वांना मार्गदर्शन मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी केले