रोटरी क्लब सांगोला व भाई गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला यांच्यावतीने भाविक भक्तांना फराळ वाटप

सांगोला:- आषाढी वारी निमित्त पंढरपूर कडे पायी जात असलेल्या वारकऱ्यांना रोटरी क्लब सांगोला व भाई गणपतरावजी देशमुख सहकारी सूतगिरणी यांच्या वतीने काल रविवार दिनांक १४ जुलै रोजी रोजी ६०० पाकिटे फराळाचे ,६०० पाणी बॉटल चे मोफत वाटप करण्यात आले. तसेच १००० कप चहा व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.

या दोन्ही सेवाभावी संस्था मार्फत वारकऱ्यांना सकाळचा नाष्टा करण्यासाठी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आले व आनंद व्यक्त केला गेला.हा कार्यक्रम राबवण्यासाठी रो.डॉ. प्रभाकर नाना माळी यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष रो. ईंजी.विकास देशपांडे सचिव रो.इन्जी.विलास बिले यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात भाई गणपतरावजी देशमुख सूतगिरणीचे अधिकारी श्री विजय वाघमोडे, श्री जे. एन ठोकळे श्री बी बी पाटील,श्री एस आर लांडगे, श्री राघवेंद्र कुलकर्णी ,श्री अंकुश शिनगारे, श्री प्रवीण येलपले इत्यादी स्टाफ तसेच रोटरी क्लबचे सदस्य रो दीपक चोथे, रो. इंजि.मधुकर कांबळे ,डॉ. मच्छिंद्र सोनलकर, रो.बाळासाहेब नकाते, रो धनाजी शिर्के ,रो.अरविंद डोंबे गुरुजी, रो.शरणाप्पा हळणीसागर,
इत्यादी उपस्थित होते