कोळा नगरी बाप्पाच्या स्वागतासाठी सजली…

सांगोला तालुक्यातील कोळे व परिसरातील गणेश भक्तांनी धुमधडाक्यात ठिकठिकाणी डेकोरेशन स्टेज सजावट करून बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे प्रत्येक घरातील युवक या उत्साहामध्ये सहभागी होत आहे असल्याचे दिसून येत आहे.

आराध्य दैवत लाडक्या बाप्पाचे उद्या शनिवारी श्री गणेश चतुर्थीला आगमन होत आहे.मुख्य परिसर असलेल्या एसटी स्टँड परिसर लक्ष्मी चौक अर्जुन चौक निर्वाण चौक दिवाणवाडा कोंबडवाडी कराडवाडी परिसरात गणेश मंडळांनी भव्य आरास उभारणीचे काम सुरू आहे. श्री गणरायाचे उद्या भक्तीभावात आगमन होणार असून श्रीगणेश मंडळासह घरोघरी गणपती बाप्पा बसत असल्याने लहान मुलांपासून तर मोठ्यांनी आज दुपारपासून गणपतीची मूर्ती व सजावटीसाठीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी केलेली दिसत होती. उद्यापासून सलग दहा दिवस या उत्सवाचा उत्साह, जल्लोष राहणार आहे. सजावट, पूजासाहित्याने दुकाने थाटली गणेशोत्सवानिमित्त वस्तूंची दुकाने लावण्यात आली आहेत.

बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी दुकाने फुललेली आहेत. यात मोत्याचे हार, मखर, पताका, चमकी पट्टी- बॉल, लायटिंग, मुकुट आदी साहित्य आहे. तसेच पूजेसाठी दूर्वा, केळीचे खांब, फळ, आंब्याची पाने देखील विक्रीसाठी उपलब्ध होती. उद्या गणेश चतुर्थीला कोळा गावात प्रसिद्ध असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सर्व साहित्य खरेदीसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अनेकांनी आजच खरेदी करून घेतली.जात आहे…

——————————————————–

बाप्पाचे उद्या ढोल- ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत होणार आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी मुहूर्त असल्याचे दिनकर काका कुलकर्णी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button