महाराष्ट्र
श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन चा विद्यार्थ्याने विद्यापीठात पटकाविला द्वितीय क्रमांक

श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन कमलापूर येथील सन 2024 25 मधील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला यामध्ये यशस्वी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ दिनांक 3 जुलै 2025 रोजी संपन्न झाला.यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बीएड विभागात द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला .
विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल 2025 या परीक्षेत बीएड प्रथम वर्षातील प्रशिक्षणार्थी रोकडे आकाश दुर्योधन याने महाविद्यालयात प्रथम क्रमांक व विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला. आहे तसेच द्वितीय क्रमांक इनामदार यास्मिन बशीर या प्रशिक्षणार्थीने मिळविला. आहे तसेच तृतीय क्रमांक पुरोहित अनिरुद्ध अनिल या प्रशिक्षणार्थ्याने मिळविला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे सहसचिव मा. संजय नवले सर तसेच कॅम्पस डायरेक्टर कमलापूर अशोक नवले सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी केले.तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचा स्वागत पर समारंभ महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख व वर्गशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला