जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची बाल दिंडी काढण्यात आली.सदरची दिंडी विठू नामाचा गजर करत गावातील हनुमान मंदीरात आले वर गावातील वारकरी यांचे समवेत भजन व नामस्मरणात तल्लीन झाली
यावेळी सुर्योदय उद्योग समूहाचे श्री जगन्नाथ भगत गुरूजी मेड शिंगी गावचे माजी सरपंच श्री जालिंदर माने प्रगती महिला पतसंस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत पाटील यांनी बाल वारकरी यांचे समवेत अभंग गायन केले
यावेळी प्रसाद म्हणून सर्व वारकरी यांना केळी वाटप करण्यात आले सदर प्रसंगी शाळेतील माता पालक गटाच्या सौ मंजुषा कांबळे सौ ज्योती राऊत सौ अमृता सरगर सौ हिना कसबे सौ मोहिनी इंगवले सौ प्रियंका मागाडे सौ रेश्मा शिंदे सौ शितल शिंदे सौ अलका कसबे सौ प्रियंका कसबे सौ प्रतिक्षा कसबे सौ रेखा वाघमोडे सौ मेणका कसबे सौ स्वप्नाली वसेकर सौ मीना कोळेकर सौ आरती कसबे केशर कसबे ग्रामपंचायत सदस्या भामाबाई कसबे श्री लखन कसबे श्री विशाल कसबे श्री समाधान कसबे अंगणवाडी सेविका सौ सुनिता कांबळे मदतनीस सौ चांदणी कसबे यांचे सह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
सदरची दिंडी यशस्वी होण्यासाठी संपूर्ण नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी केले तर संपूर्ण सहकार्य उपशिक्षक श्री चंद्रकांत बाबर सर यांनी केले तर मार्गदर्शन विस्तार अधिकारी श्री अमोल भंडारी साहेब गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब यांचे लाभले