सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालयाचा आषाढी वारी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

विठूरायाच्या नामघोष करीत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालय, सांगोला यांचा दिंडीसोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याची सुरूवात संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या पूजनाने झाली. यावेळी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. शुभांगी पवार, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर,कु.सुकेशनी नागटिळक उपस्थित होत्या.
या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी वारकरी तसेच श्रीविठ्ठल, रूक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषेत आले होते या बरोबरच पालकवर्गही मोठ्या उत्साहात या मध्ये सहभागी झाला होता. हा दिंडी सोहळा विद्यालयापासून सांगोला शहरातील कचेरी रोड, जय भवानी चौक, महादेव गल्ली ते कोष्टी गल्ली येथे चौंडेश्वरी मंदिर व तिथून पुन्हा विद्यालयात सुखरूप पोहचला. या दरम्यान मुख्य चौकामध्ये दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यालयाचा विद्यार्थी कु. आदिराज अनिल कोळसे-पाटील याने हार्मोनियमवर अभंग सादर केले.
चौंडेश्वरी मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याचे पालक श्री.रवींद्र पाटील व श्री.अमोल जयभारत गुळमिरे,शरद श्रावण गुळमिरे यांच्या वतीने हे खाऊवाटप करण्यात आले.हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन्ही माध्यमातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
हा दिंडी सोहळा महादेव गल्ली, सांगोला येथे पोहचल्यावर त्या ठिकाणी संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके,संस्थासदस्या सौ. शीलाकाकी झपके यांनी पालखीचे पूजन केले व दिंडी सोहळ्याचे कौतुक केले