मेडशिंगी येथे भर चौकात विजेचा शॉक लागून एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमीं.

मेडशिंगी ( प्रशांत पाटील) मेडशिंगी तालुका सांगोला येथे दि.21जुलै रोजी दुपारी चार वाजता भर चौकामध्ये विजेचा शॉक लागून एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमी झाल्या.
विजापूर येथील एक मेंढपाळ आपल्या शेळ्या व मेंढ्या मेडशिंगी गावामधुन भर चौकामधून वाडेगाव गावाकडे जात असताना रत्नप्रभू डेरी जवळ विजेचा सप्लाय डांबामध्ये उतरून आणि नुकताच पाऊस झाल्याने डांबाजवळील आसपासचा एरियामध्ये तो करंट उतरलाला असताना, रस्त्याच्या बाजूने त्या शेळ्या व मेंढ्या जात असताना अनेक शेंळ्यांना त्या विजेचा शॉक लागल्यामुळे त्यामध्ये एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमी झालेले आहेत. भर चौकात अशाप्रकारे करंट उतरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे. या ठिकाणी मोठी मनुष्यहानी झाली असती मात्र मुक्या प्राण्यावर हा प्रसंग आला आहे, अशी चर्चा गावात दिवसभर चालू होती.
तसेच मेडशिंगी गावामधील जागृत मरीआई देवीची आज यात्रा होती, हजारो नागरिकांची त्या रस्त्यावरून ये जा करत होती. मात्र नशिबाने कोणतीही मनुष्यहानी या ठिकाणी झालेली नाही. पावसाळा सुरू आहे अधून मधून पावसाच्या बारीक सरी बरसतात, त्यामुळे सर्व नागरिकांनी एम एस सी बी चा डांब ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून जात असताना काळजी घेणे गरजेचे आहे. आणि विशेष म्हणजे त्या खांबाला अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या सायकली लावलेल्या होत्या आणि त्याच डांबाला विद्युत प्रवाह उतरल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे. मात्र इथून पुढच्या काळामध्ये महावितरण कंपनीने योग्य ती काळजी घेऊन अशा प्रकारे होणारा अनर्थ टाळावा अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.



