सांगोला येथील भीमनगर जिल्हा परिषद शाळेबाबत विविध मागण्यांसाठी निवेदन

भिमनगर सांगोला येथील समस्त पालक व बांधवांनी जि.प. शाळेस भौतिक सुविधा मिळाव्यात म्हणून मुख्याधिकारी, सांगोला नगरपालिका, गटशिक्षणाधिकारी, सांगोला पंचायत समिती आदींना विविध मागण्याचे निवेदन दिले आहे.
भीमनगर ,सांगोला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ६५ इतका पट असून या शाळेत शैक्षणिक भौतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थाना शिक्षण घेताना अडचणी येत आहेत.
शाळेच्या शौचालयावर पाण्याची टाकी बांधून मिळावी, शाळेला प्रवेशद्वार बसवून मिळावे, शाळेत वीज कनेक्शन मिळावे, शाळा रंगरंगोटी करावी, शाळेच्या समोरील व मागील बाजूचा परिसर नियमित स्वच्छ करण्यात यावा,शाळेला स्मार्ट टी. व्ही. मिळावा ,अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी बापूसाहेब ठोकळे, राजेंद्र जॉर्ज बनसोडे, प्रविण तुकाराम बनसोडे, जगदिश यशवंत भोरकडे, लखन दिलीप बनसोडे, प्रवीण भोरकडे, अमोल बनसोडे, अविकांत चंदनशिवे , मोहन गुडदौरू आदी उपस्थित होते.



