वनविभाग सांगोला यांची मोठी कारवाई; मोटारसायकल, पिकअप खैर लाकुडमालासह जप्त

सांगोला(प्रतिनिधी):-वनविभाग सांगोला यांचेकडून वनक्षेत्रामधील मोठी कारवाई करण्यात आली असून मोटारसायकल, पिकअप खैर लाकुडमालासह जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दिली.
वनपरिक्षेत्र सांगोला मध्ये वनक्षेत्र गावांत वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व इतर सर्व वनअधिकारी यांनी दिनांक 25 मे 2024 रोजी रात्रीची गस्त् करीत होते. यावेळी बागलवाडी येथील राखीव वनक्षेत्र गटामध्ये 8 खैर झाडे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसून आले. रात्री 3 वा च्या दरम्यान बागलवाडी वनक्षेत्रात आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले असता दोन आरोपी वनक्षेत्रात जागेवरच खैर लाकुड माल व लाकुड कटर ठेवून पळून गेले. त्यानंतर आरोपीचा पाठलाग करून आरोपीला मौजे महुद येथे पकडले. यावेळी आरोपी श्री. दतात्रय गोडसे,श्री. मारुती गळवे यांची मोटारसायकल मौजे महुद येथे जप्त केले.
तसेच मौजे वाकी शिवणे ढेंबरे वस्ती येथे सकाळी 6.30 वा च्या दरम्यान श्री. शक्ती ढेंबरे यांचा पिकअप घराजवळ तपासणी केला असता पिकअपमध्ये 15 खैर लाकुड नग मिळून आले. खैर लाकुडमालासह पिकअप जप्त केला आहे. तसेच बागलवाडी व कटफळ येथील खैर माल व लाकुड कटर जप्त केला आहे. तसेच आरोपी यांनी त्याच्या जबाबमध्ये लिहुन दिले आहे की, सदर पिकअपमध्ये खैर मालाची वाहतुक मौजे शिवणे, कटफळ, महुद बु व मंगळवेढा येथे मे महिन्यात केलेली आहे. सदर पिकअप खैर मालासह पिकअप व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून सदर वनगुन्हे प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर तपास करीत आहेत.
वरील दोन आरोपींना सांगोला येथे न्यायालयात हजर केले असता. मा. प्रथम न्यायदंडाधिकारी सांगोला यांनी आरोपींना 30 मे 2024 पर्यंत फॉरेस्ट कस्टडी दिलेला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक पुणे एन.आर. प्रविण, उपवनसंरक्षक सोलापूर धैयशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बी. जी. हाके सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम जाधवर, वनपाल सांगोला एस.एल. मुढे, एस, एल, वाघमोडे वनपाल जुनोनी, जी. बी. व्हरकटे वनरक्षक सांगोला, कृष्णा मुढे वनरक्षक घेरडी, आर.व्ही. कवठाळे वनरक्षक कटफळ. ऐ.के. करांडे वनरक्षक हटकर मंगेवाडी श्रीमती व्ही.पी. इंगोले वनरक्षक अचकदाणी कंत्राटी वाहन चालक संकेत बाबर, कायम वनमजूर सर्व यांनी केली. वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा वनगुन्हा होत असल्यास 9420378279 संपर्क साधावा.