महाराष्ट्र

गुरुवर्य बापूसाहेब झपके गुणवंत शिक्षक पुरस्कार योगेशकुमार भांगे यांना जाहीर

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला, नाझरा, कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४४ वा.स्मृतीसमारोहानिमित्त देण्यात येणारा कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार योगेशकुमार भांगे जि.प.प्रा.शाळा गंगखोरी तालुका माढा यांना जाहीर झाला.अशी माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी दिली.

हा पुरस्कार उद्या सकाळी १०.०० वाजता कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रमुख पाहुणे मा.राहुल गिरी प्रसिद्ध वक्ते, बीड यांचे शुभहस्ते व प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या समारंभामध्ये प्रदान करण्यात आहे. आहे. सन्मान चिन्ह ,मानपत्र शाल व श्रीफळ असे स्वरूप आहे. सदर जिल्हास्तरीय पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून शैक्षणिक क्षेत्रात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो.

यावर्षीपासून प्रस्ताव न मागविता प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक, सामाजिक, विद्यार्थ्यांसाठी व मुलांसाठीच्या विशेष कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जात आहे.

 

——————–

सोलापूर जिल्ह्यातील आमच्या या उपक्रमाचा सोलापूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच गुरुवर्य बापूसाहेब झपके गुणव़ंत शिक्षक पुरस्कार रूपाने हे कौतुक होत आहे. याचा मनापासून अभिमान वाटला…
या पुरस्काराच्या माध्यमातून काही कर्णबधिर आणि मुक्या मुलांपर्यंत जरी हा मेसेज गेला तरी देखील या मुलांचे मुके आयुष्य बोलते होऊ शकेल…
मा.योगेशकुमार भांगे
जि.प. प्रा. शाळा गंगखोरी तालुका माढा.

——————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button