महुद बु॥ -दिनांक -13/9/2025 रोजी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत फीनिक्स प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्हा स्तरावरील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये फीनिक्स प्रशालेच्या खेळाडूंनी त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि प्रशिक्षणाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांनी विविध वजन आणि वयोगटांमध्ये पदके मिळवून संस्थेची मान उंचावली.
पदक विजेत्यांमध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे:
1) केतन केसकर 2) कन्हैया फाटे ( जिल्हास्तर ) त्याचबरोबर तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत -1) यश टकले याने नंबर पटकवला
या यशाचे श्रेय प्रशिक्षक- धर्मेंद्र सकट सर यांच्या मार्गदर्शनाला आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाला जाते, असे संस्थेचे अध्यक्ष – श्री. येडगे सर त्याचबरोबर तिन्ही प्रशालेचे प्रमुख व शिक्षक स्टाफ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या विजयामुळे तायक्वांदो खेळाला स्थानिक पातळीवर अधिक प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.