गुरुवर्य बापूसाहेब झपके तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संस्कृती बेहेरे प्रथम

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त,कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये इ.५ ते ७ वी गटामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेची संस्कृती भाग्यवंत बेहेरे हिने प्रथम क्रमांक मिळविला.तसेच श्रावणी दिलीप लवांडे सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला द्वितीय क्रमांक,ईश्वरी अशोक गायकवाड फॅबटेक पब्लिक स्कूल, सांगोला तृतीय क्रमांक,अनुराधा बाबासो फाटे श्री.छत्रपती. शिवाजी विद्यामंदिर धायटी चौथा क्रमांक,किशोरी शहाजी बाबर नाझरा विद्यामंदिर नाझरा पाचवा क्रमांक असे यश संपादन केले.हा निकाल परीक्षक सुनील जगताप यांनी जाहीर केला.या यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व झपके कुटुंबियांकडून कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके स्मृती चिन्ह देऊन प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सन्मान झाला.यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,खजिनदार शंकरराव सावंत,परीक्षक सागर विश्वासे,निखिल बडवे,सुनील जगताप,पुष्पलता मिसाळ,नितीन गवळी,सुवर्णा काशीद पाटील,
प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.
स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटक व परीक्षक सागर विश्वासे व स्पर्धक विद्यार्थ्यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. व नंतर पात्रता फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके,स्पर्धक विद्यार्थी,पालक, मार्गदर्शक शिक्षक व विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविकातून तालुक्यातून आलेल्या सर्व चिमुकल्या स्पर्धकांचे कौतुक केले. लहान वयात आपण बोलायला शिकलो की निश्चितपणे पुढे वाचनाच्या माध्यमातून आपण वक्तृत्व स्पर्धेची चांगली तयारी करू शकता असा विश्वास व्यक्त करत सर्व उपस्थितांचे स्वागत केले. परीक्षक सत्कार निवेदन उन्मेष आटपाडीकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या तेली यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी केले.
———————-
कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडलेला प्रत्येक विषय हा अतिशय मौलिक होता. विषयाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याची प्रगल्भता या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्ध झाली. अनेक विद्यार्थी आपल्या वक्तृत्व कलेच्या माध्यमातून बहरताना दिसत आहेत. उत्कृष्ट संयोजनातून ही स्पर्धा पार पडत असल्यामुळे या स्पर्धेला येताना आत्मिक समाधान लाभते.
*सागर विश्वासे*
*वक्तृत्व स्पर्धा उद्घाटक व परीक्षक*
———————-



