सांगोला तालुका

दक्षता हॉस्पिटल येथे मोफत विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न व फिजिओथेरपी युनिट चे उदघाटन उत्साहात संपन्न

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ,जय भवानी चौक येथे अत्यल्प वेळेमध्ये गोर गरीब गरजू रुग्णांसाठी शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मोफत १०० पेक्षा जास्त गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.या शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी डॉक्टर्स,मेडिकल ऑफिसर,ऑपरेशन थिएटर स्टाफ, नर्सिंग स्टाफ,डेटा ऑपरेटर,कर्मचारी वर्ग,आरोग्यमित्र अश्या अनेक लोकांनी मेहनत घेतली यासाठी दक्षता हॉस्पिटल डायरेक्टर्स यांच्याकडून या सर्वांचा अभिनंदनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा मध्ये मूत्ररोग तज्ञ डॉ चेतन शाह,भुलतज्ञ डॉ.शीतल येलपले,सर्जन डॉ अमर शेंडे, रेडिओलॉजिस्ट डॉ.राहुल माने,फिजिशियन डॉ.सुशांत बनसोडे,डॉ. निरंजन केदार,डॉ. अण्णासो लवटे,मेडिकल ऑफिसर डॉ. महादेव जगताप,डॉ.वृषाली खांडेकर, डॉ मुजीप इनामदार,डॉ.प्रतिक चव्हाण, डॉ.रविना ,डेटा ऑपरेटर संदीप किरगत, एजाज शेख,आरोग्यमित्र सुभाष बनसोडे,सर्व नर्सिंग स्टाफ,लॅब व एक्स रे तंत्रज्ञ ,सर्व कर्मचारी वृंद यांचे हार पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन दक्षता हॉस्पिटल चे डायरेक्टर्स यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सांगली,मिरज,सोलापूर,कोल्हापूरला होणारे विविध प्रकारचे मुतखडा ,किडनीतील खडे,मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयतील खडे,प्रोस्टेट ग्रांथिची सूज अशी गुंतागुंतीची ऑपरेशन आता सांगोल्यातील दक्षता हॉस्पिटलमध्ये मोफत होत आहेत.

तसेच दक्षता हॉस्पिटल च्या अत्याधुनिक फिजिओथेरपी युनिट चे उदघाटन सांगोला तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील भीष्मपितामह डॉ.अमर शेंडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.या प्रसंगी फिजिओथेरपिस्ट डॉ.ऐश्वर्या देशमुख,तालुक्यातील जेष्ठ डॉ.मच्छींद्र सोनलकर,डॉ.राहुल माने,डॉ.चेतन शाह,डॉ.सुदीप चव्हाण, *तसेच दक्षता हॉस्पिटलचे सर्व संचालक डॉ. शिवराज भोसले, डॉ.संतोष शिंदें,डॉ.धनाजी जगताप,डॉ. सुहास पाटील, डॉ.दत्तात्रय इंगोले,डॉ.अभिजित सोनलकर, डॉ.फिरोज तांबोळी,डॉ.प्रवीण पैलवान उपस्थित होते.दक्षता हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे विभाग यामध्ये जनरल मेडिसिन-आय.सी.यु.,मूत्ररोग, अस्थीरोग,फिजिओथेरपी,सर्जिकल,सोनोग्राफी विभाग कार्यन्वित आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!