शैक्षणिकसांगोला तालुका

लतादीदींना नृत्यातून आदरांजली म्हणून उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात बालचमुंचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
यावर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात सादर करण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिलीभक्ती गीत, बालगीत ,आणि गवळणी इयत्ता दुसरी आनंदघन यामध्ये लतादीदींनी संगीतबद्ध केलेले गाणी यानंतर इयत्ता तिसरी लतादीदींनी गायलेले हिंदी गाण्यातील अजरामर गीते इयत्ता चौथी लतादीदींनी गायलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या विराण्या विद्यार्थ्यांनी आनंदाने सादर केल्या व पालकांनी या सोहळ्याचा आस्वाद घेतला त्यांनी गायलेल्या अजरामर गीतातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय जबाबदारी, ध्येयनिश्चिती ,निसर्गाबाबतची कृतज्ञता ,या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा  डॉ. सौ. संजीवनी ताई कोषाध्यक्ष डॉ. सौ. शालिनीताई भोसेकर बाई, लाटणे बाई, वसुंधरा ताई सुमनताई, शालिनी काकी माध्यमिक विभाग मुख्याध्यापक  श्री. कुलकर्णी सर प्राथमिक विभाग उपमुख्याध्यापिका मा. सौ. स्वरालीताई पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका  सौ. सुनीता कुलकर्णी सर्व मान्यवर शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते तसेच संस्थेतील विविध उपक्रमांची माहिती सौ. संध्या ताई यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी बाई व कवठेकर बाई यांनी केले. आणि लतादीदींच्या आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!