सांगोला तालुका

श्री चौंडेश्वरी महिला योगवर्ग कोष्टी गल्ली सांगोला येथे मोफत तीन दिवसीय योग प्राणायाम शिबीर संपन्न       

श्री चौंडेश्वरी महिला योगवर्ग कोष्टी गल्ली सांगोला येथे मोफत तीन दिवसीय योग प्राणायाम शिबीर आयोजीत केले होते.  यामध्ये  योगिक जाॅगिंग, सूर्यनमस्कार, ताडकन, वृक्षासन, त्रिकोणासन ,विरासन, पादहस्तासन इत्यादी उभी आसने घेण्यात आली.

 

अर्धचंद्रासन, उष्ट्रासन,  मंडुकासन, शशांकासन ,वक्रासन, पश्चिमोतानासन,भूनमनासन, कटिसौंदर्यासन, इत्यादी बैठी आसने घेण्यात आली.    भूजंगासन, शलभासन,  अर्धहलासन,  सर्वांगासन, पूर्ण हलासन, अशी पाठीवरील, व  पोटावरील आसने घेण्यात आली.  भस्त्रिका, कपालभाती,  त्रिबंधासहित बाह्य प्राणायाम,  अनुलोम-विलोम,  भ्रामरी,   शितली-शितकारी, इत्यादी प्राणायामाचे ,प्रकार घेण्यात आले.    तसेच योगा व प्राणायाम केल्याने सर्व छोटे- मोठे आजार कमी होण्यास मदत होते. आणि नियमित व सातत्यपूर्ण योग व प्राणायाम केल्यामुळे, सर्दी,  खोकला,  मयग्रेन,  गुडघेदुखी,  कंबरदुखी, असे अनेक प्रकारचे आजार  कमी होतात. या शिवाय रक्त शुध्द होते. रक्त वाढते, शुगर कमी होते.बीपी नाॅर्मल रहातो. असे अनेक फायदे आहेत.  यासाठी सर्वांनी नियमित योगा व प्राणायाम करायला हवे. दिवसातील 24 तासातील फक्त एक तास वेळ आपल्या स्वतःसाठी द्यायला हवा असे योग शिक्षिका सौ.मंगलताई लाटणे यांनी सांगितले.

 

श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी गल्ली येथे गेली 12 वर्षे मोफत  योग वर्ग सुरु आहे. सकाळी सहा ते साडेसात या वेळेत नियमित योगा क्लास सुरू आहे. तरी सांगोला शहरातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान योग शिक्षिका सौ.मंगलताई लाटणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!