सांगोला मातोश्री वृद्धाश्रमातील महिलांना साडी वाटप…

गुरुवार दिनांक २१ रोजी वीरशैव शिव पार्वती रुद्र मंडळाच्या माजी सचिव सौं सुवर्णा रमेश तेली यांचा पुत्र अँडव्होकेट तेजस रमेश तेली यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसेवा बहुउद्देशीय संस्था कडलास सावंतवाडी संचलित मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील महिलांना साड्या देण्यात आल्या.
तसेच जागतिक काव्य दिन म्हणून मंडळाच्या सचिव कवयित्री सुवर्णा तेली माजी अध्यक्षा कवयित्री सौं हर्षदा गुळमिरे आणि सदस्यां अनिता घोंगडे यांनी आईवर कविता सादर केल्या
वृद्धाश्रम येथील महिलानी भजन सादर केले .मंडळाच्या अध्यक्षा सौं छाया काकु तेली यांनी गवळण सादर केली याचा आनंद वृद्धाश्रमातील सर्व महिलांनी घेतला. सौ वंदना महीमकर सौ सुवर्णा तेली सौ हर्षदा गुळमिरे यांनी मनोगत व्यक्त केले. मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल जाधव सर आणी शिवपार्वती रूद्र मंडळाच्या महिला संख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार सौं शुभांगी तेली यांनी मानले.