शहीद जवान संस्थेने वीर जवानांच्या बलिदानाचा वारसा रक्तदानाच्या रूपाने जोपासला: पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी

वीर जवानांच्या पत्नीचा गुणगौरव व सन्मान करणे आपली देशभक्ती व सामाजिक बांधिलकी आहे. वीर जवानांनी देव देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले या बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ या संस्थेने सलग चौथ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे रक्तदान हे जीवनदान आहे या जीवनाच्या मनी वसा घेऊन 26 11 च्या शहिदांच्या स्मृतिपित्यर्थ रक्तदानाचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे व जो आरसा छत्रपती शिवाजी महाराजांनी जपला तोच वारसा 26 11 ला वीर जवानांनी जपला अशा वीर जवानांच्या पत्नीचा संबंध करणे आपली भाग्य आहे असे प्रतिपादन वरिष्ठपोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले
ध्यास जनसेवेचा या ब्रीद वाक्याने स्थापन झालेल्या शहीद जवान बहुउद्देश सामाजिक संस्था रजि;) सांगोला यांच्या वतीने 26 11 दिन व संविधानाचे औचित्य साधून नेहरू चौक सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 26 11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतीत प्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात 119 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली संस्थेच्या रक्तदान शिबिराचे हे सलग चौथे वर्ष आहे.
प्रारंभी सकाळी साडेदहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन वीर पत्नी शितल वाघमोडे (बामणी) वीर पत्नी मंगल आदलिंग( कमलापूर) यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी अरविंद केदार इंजिनीयर रमेश जाधव मेजर उत्तम चौगुले माजी नगरसेविका अनुराधा खडतरे मेजर आनंद व्हटे, मेजर भाऊसौ निमगे, सुरेश फुले ,रमेश फुले, राम बाबर, सुभेदार मेजर रविकांत मराळ पत्रकार मोहन मस्के सर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद केदार म्हणाले की आपल्या तालुक्यातील या दोन जवानांना सीमेवर लढत असताना वीरमरण प्राप्त झाले आणि या संस्थेने वीर पत्नींना बोलवून त्यांचा सन्मान केल्याबद्दल संस्थेचे भरभरून कौतुक केले.
या रक्तदान शिबिराप्रसंगी आनंद घोंगडे,इंजि; संतोष भोसले, बाबुराव खंदारे, वसंत सुपेकर, अतुल माळी एस आर भोसले सर ,संतोष ऐवळे माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला पदाधिकारी, अरुण काळे, नाथा जाधव अरविंद डोंबे गुरुजी, डॉक्टर सोमेश यावलकर वसंतराव फुले,डॉक्टर अश्विनी केदार, सौ संगीता चौगुले, सौ निमगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी शहीद जवान संस्थेच्या पदाधिकार्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अच्युत फुले व आभारप्रदर्शन संजय गव्हाणे यांनी केले व शिबिरामध्ये रक्त संकलनाचे कार्य रेवनील बल्ड बँकेच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.