sangolaeducational

सांगोला विद्यामंदिर चे एम.टी.एस. परीक्षेत सुयश ; 4 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर 2 जिल्ह्यात प्रथम

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला (वार्ताहर)- वाडिया कॉलेज, पुणे यांचेकडून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च- 2024 या परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कुमार दिग्विजय संभाजी पवार (इ.8 वी,राज्यात 5 वा), कुमारी समृद्धी संजय भोसले (इ.9 वी, राज्यात 18 वी), कुमार यश आकाश बिले (इ.9 वी,राज्यात 19 वा), कुमारी तनुजा बालाजी चोपडे (इ.9 वी, राज्यात 22 वी) विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश मिळवले.

या परीक्षेत प्रशालेतील कुमार प्रतिक अमोल नलवडे (इ.8 वी, जिल्हा प्रथम), कुमारी शामल महेश आलदर (इ.8 वी, जिल्हा द्वितीय), कुमारी जिज्ञासा तानाजी घाडगे (इ.8 वी,जिल्हा द्वितीय), कुमारी सानिका राजू चौगुले  (इ.8 वी, जिल्हा तृतीय), कुमारी भक्ती भारत कदम (इ.8 वी,जिल्हा तृतीय), कुमार श्रवण अमर वस्त्रद (इ.8 वी,जिल्हा तृतीय) तसेच कुमारी अपूर्वा अजित पाटील (इ.9 वी, जिल्हा प्रथम), कुमार पांडुरंग शिवाजी हजारे (इ.9 वी,जिल्हा तृतीय) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश मिळवले. याशिवाय प्रशालेतील 15 विद्यार्थी विशेष प्राविण्यधारक, 5 विद्यार्थी तालुकास्तर, 47 विद्यार्थी प्रमाणपत्रधारक ठरले आहेत.

वरील सर्व विद्यार्थ्यांना सचिन बुंजकर, सचिन बनकर, शुभांगी घोंगडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

1992 पासून सुरू झालेली अतिशय दर्जेदार आणि उच्चतम काठिण्य पातळी असणाऱ्या MTS परीक्षेतील या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे, खजिनदार शं.बा.सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके यांच्यासह सर्व संस्थासदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे, प्रशाला विभाग प्रमुख वैभव कोठावळे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!