पनवेल येथील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या असेंबली मध्ये सांगोला इनरव्हील क्लब चा गौरव.

डिस्ट्रिक्ट ३१३ चा पदग्रहण समारंभ नुकताच पनवेल येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगोला इनरव्हील क्लबचा झेंडा डिस्ट्रिक्ट मध्ये फडकला.
या कार्यक्रमांमध्ये सांगोला इनरव्हील क्लबच्या 2023 -24 मधील अध्यक्ष सौ सविता लाटणे आणि सेक्रेटरी सौ अश्विनी कांबळे यांच्या वर्षभरातील कामाची दखल घेऊन चार बक्षीसे इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांना मिळाली. १)बेस्ट प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि टीम २) उत्कृष्ट काम ३) बेस्ट ऑल राऊंडर क्लब ४) सेंचुरी इअर ऑफ द प्रेसिडेंट अशी बक्षीस देऊन सांगोला येणारी क्लबला गौरवण्यात आले. तसेच सांगोला इनरव्हील क्लबच्या कार्याबद्दल सर्व डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर कौतुक केले.
पनवेल येथील कार्यक्रमासाठी 2024-25 च्या अध्यक्ष सौ स्वाती अंकलगी आणि इनरव्हील मेंबर सौ कविता दिवटे या उपस्थित होत्या. सर्व नवीन पदाधिकारी 20 जुलै रोजी पदभार स्वीकारणार आहेत