महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये गुड टच बॅड टच कार्यशाळा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनीसाठी गुड टच बॅड टच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राहुल बिराजदार ( समुपदेशक,ब्लिड सेफली लैंगिक शिक्षण मोहीम) प्राचार्य श्री सिकंदर पाटील ए. ओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले. “मानसशास्त्रामध्ये मुलींची वाढ आणि विकास तसेच वादळी अशांततेचा काळ” या वयातील मुलींसाठी गुड टच बॅड टच या विषयावर समुपदेशक श्री.राहुल बिराजदार यांनी पाचवी ते बारावी विद्यार्थिनींना समुपदेशन केले. मुली विविध प्रलोभनांना बळी कशा पडतात.त्याचबरोबर चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा, हे अतिशय सोप्या भाषेमध्ये विद्यार्थिनींना समजून सांगितले. “आकर्षण मैत्री प्रेम” या तीन शब्दांमधील फरक ही राहुल बिराजदार यांनी विद्यार्थिनींना सांगितला. त्याचबरोबर पोक्सो अॅक्ट चे कायदे कोणकोणते आहेत. हे विद्यार्थीनींना समजावून सांगितले. या कार्यशाळेने विद्यार्थिनींच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरेही श्री राहुल बिराजदार यांनी अतिशय मनमोकळ्या वातावरणात विद्यार्थिनींशी संवाद साधत दिली.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर , मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांचे या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विद्या नरूटे यांनी केले.