महाराष्ट्र

ईडब्लूएस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांना दिलासा

लोकसेवा आयोगाकडून  निवड झालेल्या मात्र ईडब्लूएस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांना दिलासा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार मॅटकडे भक्कमपणे बाजू मांडणार असून, या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली आयोजित केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 1143 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 1032 उमेदवारांना 1 डिसेंबर रोजी नियुक्ती दिली. मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून परीक्षा पास झालेल्या आणि नंतर हे आरक्षण रद्द करण्यात आल्याने ईडब्ल्यूएस कोट्यातून नियुक्ती देण्याबाबत अडचण झालेल्या 111 अभियंत्यांचे भवितव्य अंधारात होते. हे 111 अभियंते नियुक्तीसाठी उच्च न्यायालयात गेले असता उच्च न्यायालयाने हे प्रकरण मॅटकडे वर्ग केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!